राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर मलिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. त्यासाठी मलिक यांच्या विरोधात भाजपने आंदोलन सुध्दा पुकारले आहे. राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी शुक्रवारी शेवगावमध्ये मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी सुजय पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी आंदोलनात घोषणाबाजी केली. तसेच नायब तहसिलदार मयूर बेरड यांना निवेदन पत्र देण्यात आले. या निवेदनात ईडीने अटक केल्यानंतर आता मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच, सुजय पाटील यांनी युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय उचलून धरत राज्यातील महाविकास आघाडीवर निशाना साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली रशिया-युक्रेन वादामुळे युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी परत मायदेशी आणले जात आहेत. त्यांची भाजपतर्फे भेट घेतली जाईल.
80 विमानांद्वारे युक्रेनमधून विद्यार्थी आणण्याचे काम सुरू आहे. चार दिवसांत 80 विमानांच्या माध्यमातून 1 हजार विद्यार्थी परत आणले. त्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार करते. असे पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारकडून 80 विमानांतून विद्यार्थी आणले जात आहेत.
त्यावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील सुपुत्रांसाठी किमान एक तरी विमानाचा खर्च उचलावा. एक विमान पाठवू शकत नाहीत मात्र घामपुसता पुसता टिव्हीवर मुलाखती द्यायच्या मान वाकडी करून बोलत रहायचं. हलत रहायचं मोदींना शिव्या द्यायच्या या पलिकडे महाविकास आघाडी काहीही करत नाही. अशा शब्दात सुजय पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
दरम्यान शेवगाव येथे भाजपने केलेल्या आंदोलनात नवाब मलिक यांचा निषेध नोंदविण्यात आला. यानंतर भाजपच्यावतीने तहसीलदाराला निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा परिषद सद्स्य राहुल राजळे, भाजपचे तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे, अभय आव्हाडसह अनेक भाजपचे नेते, अधिकारी आणि पदधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
बॉल ऑफ द सेंच्युरी: शेन वॉर्नचा तो चेंडू ज्याने पूर्ण जग झाले होते हैराण, पहा तो ऐतिहासिक क्षण
नागराज मंजुळेंमुळे बदललं ‘या’ २० वर्षीय मुलांचं आयुष्य, आभार मानत म्हणाला, कधी विचार केला नव्हता की..
शेन वॉर्नची स्वप्नात देखील धुलाई करायचा सचिन तेंडुलकर, शेन वॉर्नने स्वतःच सांगितला होता ‘तो’ किस्सा
कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू