bjp : अंधेरी पोटनिवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. अंधेरी पोटनिवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजप उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेत शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला एक विनंती केली होती. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर भाजपने देखील माघार घेतली यामुळे सध्या राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे की, भाजपने राज ठाकरेंचा शब्द पाळला.
मात्र असं असलं तरी देखील एक वेगळीच बातमी आता समोर येतं आहे. जरी भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी देखील, ऋतुजा लटके यांच्या पुढील अडचणी काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. ऋतुजा लटके यांच्या विरोधात एक डाव भाजपकडून आखला जातं असल्याच बोललं जातं आहे.
हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून यातून दिसून येतं आहे लटके यांच्या विरोधात डाव टाकला जात आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेलांच्या माघारीनंतर लटकेंच्या विरोधात आता वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आरोप आहे.
नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या निवडणुकीत काका नाही. कमळाचे चिन्ह नाही पण नोटा चे बटन आहे. ‘नोटा’द्वारे रेकॉर्ड मतदान करण्याचं आवाहन या क्लीपमध्ये करण्यात आले आहे. यामुळे आता ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. यावर अद्याप भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
तसेच ठाकरे गटा विरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा केला जात आहे. या पोट निवडणुकीसाठी एकूण 14 जणांनी अर्ज भरले होते. त्यातील 7 जणांनी माघार घेतली आहे. 7 जणांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणुक होणारं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…