Share

पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल बंद करणार, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; हॉटेलमालकांची नाराजी

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सण-उत्सव, सोहळे आधीप्रमाणे पार पडत आहे. अशातच श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तसेच काही कामे हे अंतिम टप्प्यात आहे. (nonveg hotel, wine shop close because of palkhi)

या पालखी संबंधित वेगवेगळे निर्णय प्रशासन घेत आहे. पालखी तळासह इतर सुविधांची कामे १५ जूनपर्यंत पुर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहे. अशातच आता प्रशासनाने पालखी संबंधी एक मोठा निर्णय घेतला आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावरील सर्व मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट आणि दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राजेश देशमुख यांनी घेतला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच या निर्णयामुळे हॉटेल मालकांनी नाराजी दर्शवण्याचीही शक्यता आहे.

उरळी देवाची येथील साईड पट्ट्यांची कामे, वडकीनाला येथील पालखी विसावा, जेजुरी पालखी तळ, लोणी काळभोर, बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील सेवा रस्त्याची दुरुस्ती, दौंड ते नीरा रस्त्याच्या साईड पट्ट्यांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे.

तसेच परिवहन विभागातर्फे पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची सुरक्षाविषयक तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, मच्छी मार्केट, दारुची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तर अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्यपदार्थ आणि पेयांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालखी जेव्हा प्रस्थान करेल, त्यावेळी ठराविक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी पालखीतील नागरिकांसाठी सोईसुविधांबाबतही चर्चा झाली आहे. पालखी मार्गावरील रुग्णालयातील १० टक्के खाटा पालखी सोहळ्यादरम्यान आरक्षित करुन ठेवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
गोपीनाथ मुंडेची ‘ती’ विनंती बाळासाहेबांनी एका क्षणात मान्य केली होती; उद्धव ठाकरेंनी सांगीतला किस्सा
नवी गाडी घेऊन देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा अपघात; दोन भावांचा मृत्यू, आई – मुलगा गंभीर जखमी
ह्युंदाई, टाटाला मागे टाकत मारुती सुझुकीची ‘ही’ गाडी बनली नंबर वन, वाचा किंमत अन् फीचर्स

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now