Gopichand Padalkar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पडवळकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेचे पडसाद सध्या उमटताना दिसत आहेत. गोपीचंद पडळकर यांना टीका करणे महागात पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल, असे वादग्रस्त वक्तव्य पडवळकर यांनी केले आहे. याच वक्तव्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. राज्यातील आणखी काही ठिकाणी राष्ट्रवादीकडून कडाडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीने आता पडवळकरांनी टिकेची पातळी घसरण्याची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांवर वारंवार केल्या जाणाऱ्या या टीकेमुळे आता एका माझी सैनिकाच्या मुलाने देखील पडवळकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचे पुत्र माधव उर्फ नितीन सूर्यकांत यांनी पुण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी पडवळकर यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली असून काही सवाल उपस्थित केले आहेत. सध्या या बॅनरची चर्चा सर्वत्र सुरू आहे. पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध, असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.
तसेच, माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धात देशसेवा केली आहे. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, पडवळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
यादरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे पवार कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करत असतात. ते अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत असतात. पडवळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या पातळीवर जाऊन पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे हा वाद भविष्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
२०२४ च्या निवडणूकांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार? अमित शहा म्हणाले…
पुण्यात भीषण अपघात; दारूड्या पिकअप ड्रायव्हरने ८ जनांना चिरडलं, ५ लोकं जागीच
“बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते आम्ही सावंत बंधूंनी करुन दाखवलं”; तानाजी सावंतांचे गर्विष्ठ वक्तव्य