nitin raut criticize narendra modi and arvind kejriwal | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या वेगवेगळ्या योजनांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी चलणी नोटांवर श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची विनंती केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीची देशभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गुजरातच्या निवडणूकीपूर्वी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याची चर्चा आहे. नोटांच्या एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूंना लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो द्यावा. त्यामुळे देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर अनेक नेते प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे. केजरीवाल धर्माची नशा विकण्याचे काम करत आहे, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते असे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात जास्त फरक नाहीये. तसेच त्यांनी ट्विट करत एक प्रश्नही उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नाही?
पुढे नितीन राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या शाळांचे ब्रँडींग करतात, त्या शाळांमध्ये त्यांनी जायला सुद्धा हवं. तिथला अभ्यास त्यांनी करायला हवा. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या सिद्धांताला समजून घेण्याची गरज आहे. मग तुम्हाला धर्माची नशा विकण्याची गरज पडणार नाही.
तसेच मोदी आणि केजरीवाल यांच्यात जास्त फरक नाही. ते दोघेही पाखंडी आहे. अरविंद केजरीवाल, भाजप आणि आरएसएस हे नेहमीच बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा सिद्धांतांचा अवमान करत असतात, असे म्हणत नितीन राऊत यांनी मोदी आणि केजरीवाल यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
bjp : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला भलमोठं खिंडार; ‘या’ बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम
arvind kejriwal : नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीने उडाली खळबळ
bachchu Kadu : १ तारखेपर्यंत पुरावे द्या, नाहीतर १२ आमदारांसोबत मी…; राणांच्या आरोपांवरून बच्चू कडू भडकले