सध्या राज्यात कोळशाचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यावरुन भाजप नेते ठाकरे सरकारला सुनावत आहे. तर सत्ताधारी नेतेही यावरुन केंद्राकडे बोट दाखवत आहे. अशात यावर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. (nitin raut angry on gautam adani)
उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या बैठकीत राज्यातील औष्णिक विद्युत प्रकल्पांतून आठ हजार मेगावॅटची वीज निर्माण करण्याचे आदेश दिले आहे. कोल माईनमधील कर्मचाऱ्यांचा स्ट्राईक झाला होता, डिझेलचे दरही वाढल्याने त्याचा परीणाम कोळशाच्या टंचाईवर झाला आहे, असे राज्य सरकारकडून म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे आम्हाला कोळसा आणण्यासाठी रेल्वे गाड्याच देत नाही, असे म्हणत हात झटकले. आम्ही गेल्याच आठवड्यात राज्यात भारनियमन होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतू परिस्थिती बदलली आहे, असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्यात भारनियम होणार असल्याची घोषणाही केली आहे,
अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लांटमधील पुरवठा बंद केला. ३१०० मेगावॅटचा करार आहे. सप्लाय १७६५ मेगावॅट केला. त्यांच्याकडून चौदाशे मेगावॅट कमी वीज मिळाली. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे वीज टंचाई निर्माण झाली. जेएसडब्ल्युकडून १०० मेगावॅट वीज मिळायची, परंतू त्यांचा प्लांट बंद झाल्याने ती मिळत नाही, असे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
सीजीपीएलसोबत जो करार झाला, त्यानुसारही मागणी केली होती. ७६० मेगावॅट वीज मागितली होती. त्यांनी ६३० मेगावॅट वीज दिली. आम्हाला सध्या वीज मिळत नाहीये. त्यामुळे आम्हाला भारनियम करावे लागत आहे, असेही नितीन राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
तसेच हे भारनियम कधी संपेल हे सांगता येत नाही. यामुळे नागरिकांनी विजेच्या वापरावर काटकसर करावी. भारनियमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. तुम्हाला मेसेज, व्हॉट्सऍपद्वारे कळवू. आम्हाला जर १५०० मेगावॅट कुठूनही वीज मिळाली, तर आम्ही भारनियम रद्द करु, असेही नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अमोल मिटकरींना माफी मागावीच लागेल’; राष्ट्रवादीच्या नेत्याची जाहीर पोस्ट
‘निर्लज्जपणे दात काढणारे जयंत पाटील आणि तीन-चार बायका सोडणारे धनंजय मुंडे’, मिटकरींच्या ‘त्या’ विधानाने राजकारण तापलं
दिलदार दादा! जुन्या मित्राचा प्राण वाचवण्यासाठी अजित पवारांनी थेट अमेरिकेपर्यंत लावली फिल्डिंग