पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वसाहत वाढल्याने प्रवाशांना वाहतुकीच्या समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे. अलीकडे पुणे शहरात रस्त्यांचे जाळे वाढवण्यात आले आहे. मात्र वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. अशातच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणेकरांसाठी एक खुशखबर दिली आहे.
शिरुर ते वाघोली (Shirur to Wagholi) येथे तीन मजली पूल बांधणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यामुळे आता प्रवास सुसाट होणार आहे. शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील (Pune) किवळे येथे अल्ट्रा हाय परफॉरमन्स काँक्रिट प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना गडकरी यांनी विविध मुद्यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पुण्यात शिरूर ते वाघोली मोठा रस्ता बांधणार आहे. तो तीन मजली असणार आहे. 15 हजार कोटी चा हा रस्ता असणार आहे.तळेगांव-चाकण रस्त्यावर देखील करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना गडकरी यांनी याबाबत प्लॅन सविस्तर सांगितला. ते म्हणाले, शिरुर ते वाघोली येथे आठ लेन रस्ता, वरती सहा लेनचा ब्रीज आणि त्यावर सहा लेनचा ब्रीज आणि त्यावर पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसीटी असा प्लॅन असणार आहे. तळेगाव आणि चाकण रस्त्यावर हा प्रकल्प करण्याचा विचार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘सकाळ सन्मान’ सोहळ्यात गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक विनंती केली आहे. मुंबईतील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की, ‘मी बांधलेले ५४ उड्डाणपूल तोडावेत आणि रस्त्यावर दुमजली पूल आणि त्यावर मेट्रो मार्ग असे तीनमजली पूल बांधण्याची गरज आहे.’
तसेच ‘लोकशाहीत मी भाजपचा मंत्री नसून सरकारचा मंत्री आहे. त्यामुळे येणाऱ्याचे काम योग्य असेल तर ते केलेच पाहिजे हे माझे कर्तव्य आहे. मी काही फार विद्वान नाही, असे नितीन गडकरी म्हणाले. ‘उद्देश हा आहे की बांधकामाचा खर्च कमी करणं आणि बांधकामाचा दर्जा वाढवणं, असे गडकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
RRR चित्रपटासाठी रामचरण, ज्युनिअर NTR ने घेतली तब्बल ‘एवढे’ कोटी; वाचून डोळे होतील पांढरे
सततच्या लोड शेडिंगमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उचलले मोठे पाऊल, तेलंगणात खरेदी केल्या जमिनी
IPL सुरु होताच जिओने आणला जबरदस्त प्लॅन, आता फुकटात बघा संपूर्ण IPL
“गनिमी काव्याने तुमची हत्या होऊ शकते”; कार्यकर्त्यांना अडवल्याने सोमय्यांचा गंभीर आरोप