सायरस मिस्रींच्या मृत्यूनंतर मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; आता मागच्या सीटवर बसणाऱ्यांनाही…

अलीकडे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे. अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले आहे. सर्वसामान्य नगरिकांसोबतच, नेत्यांनी देखील अपघातात आपला जीव गमवला आहे. अलीकडेच १४ ऑगस्टला शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं.

याचबरोबर टाटा सन्सचे माजी चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती असणारे सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी पालघरजवळील एका रस्ते अपघातात निधन झाले. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. या मोठ्या घटनेनंतर आता रस्ते अपघातांवरुन मोठी चर्चा सर्वत्रच होत आहे.

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट (Seat Belt) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल.

वाचा काय म्हणाले नितीन गडकरी..?

काल नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सीट बेल्टबाबत घोषणा केली आहे. कारच्या मागील आसनांवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले,  ‘आधीपासूनच मागील आसनांवरील प्रवाशांना सीट बेल्ट लावणे हे अनिवार्य आहे. मागच्या सीटवरील प्रवाशांनी पुढच्या सीटप्रमाणे बेल्ट न लावल्यास अलार्म वाजेल. त्यानंतरही त्यांनी बेल्ट लावला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.’

दरम्यान, गडकरी या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले की, ‘सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. “कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर सर्वात वाईट आहेत आणि ते देशातील रस्ते अपघातांना जबाबदार असल्याचे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या
MNS : राज्य हादरले! मनसेच्या बड्या नेत्याला चाकूने भोसकून ठार मारले; हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल