Share

नितीन देशमुखांचे अपहरण झालेच नव्हते, शिंदे गटाने दाखवला मोठा पुरावा, ‘ते’ फोटो केले व्हायरल

एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बंडखोरी केल्यापासून आमदार नितीन देशमुखही चर्चेचा विषय ठरले आहेत. नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर आरोप लावला होता की त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते, असा खुलासा शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता.

यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी गुजरात पोलिसांवर गंभीर आरोपही केले होते. सुरतमध्ये मला मारहाण करण्यात आली होती. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले होते, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आरोप केले होते. त्यानंतर राजकारणात खळबळ माजली होती.

शिंदे गटाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आले नव्हते. पण आता शिंदे गटाने नितीन देशमुख यांचा भांडाफोड केला आहे. त्यांनी थेट नितीन देशमुखांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. नितीन देशमुख यांना चार्टर फ्लाईटमधून रिलीज करण्यात आलं होतं असं या फोटोतून दिसत आहे.

त्यांना सुखरूप मुंबईत पोहोचवल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने त्यांचे अपहरण केलेच नव्हते असे यातून स्पष्ट होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजली आहे. दरम्यान, नितीन देशमुख यांनी काय काय घडलं याचा घटनाक्रम सांगितला होता.

ते म्हणाले होते की, मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले होते. मला मारहाण करण्यात आली होती. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले होते.

मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले होते. तसेच आता अकोल्याला घरी जाणार असल्याचे देखील आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले. बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. पण याबद्दल त्यांच्या कुटूंबियांना काही माहिती नव्हती.

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने काल अकोला शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या पतीचे अपहरण करण्यात आले आहे, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. ‘नितीन देशमुख यांनी काल रात्री मला फोन केला होता. त्यांनी मला अकोल्याला परत येणार असल्याचे सांगितले होते, पण ते परत आले नाहीत’, असे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले होते.

महत्वाच्या बातम्या
“शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं, मुख्यमंत्र्यांनी मला शिकवण दिली, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?- दीपाली सय्यद
आधी भाजपमध्ये प्रवेश करा मगच सरकार स्थापण करू; भाजपने एकनाथ शिंदेंना घातली अट
VIDEO: पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी.., सध्याच्या राजकारणावर काय म्हणाली प्राजक्ता माळी?
…तरच सरकार स्थापण करू; भाजपने एकनाथ शिंदेंना घातली ‘ही’ अट; शिंदेंना धक्का

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now