Share

मोठी बातमी! नितेश राणेंनी हायकोर्टातील जामीन याचिका घेतली मागे; चौकशीला जाणार सामोर

nitesha rane

अखेर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे नितेश राणे शरणागती पत्करणार आहे. कालच नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला होता. (nitesh rane withdraw his bail application from bombay high court)

तसेच याबाबत नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.’

दरम्यान, राणे यांचा उच्च न्यायालयासमोरील जामीन अर्ज एका निवेदनासह मागे घेण्यात आला आहे. या निवेदनात नितेश राणे पोलिसांच्या चौकशीला शरण जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून १० दिवसांचे अटकेपासून संरक्षण मिळाले होते. मात्र 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही नितेश राणे तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीला सामोरे जाणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. त्यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.

तसेच त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

या प्रकरणी आता न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली नीलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पहिल्या दिवशी निवृत्ती अन् दुसऱ्याच दिवशी भाजपचे तिकीट; ईडीच्या अधिकाऱ्याला मिळाली विधानसभेची उमेदवारी
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या नात्यावर कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच..
दादागिरी आली अंगलट! पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now