शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाला भाजपचा पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. भाजप शिंदे गटातील आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्ये देखील ‘ऑपरेशन लोटस’ सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यादम्यान नितेश राणेंचे एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की, आजही समिती स्थापन होत नाहीये, सर्वे होत नाहीयेत आणि मराठा तरूणांचे वय वाढत चालले आहे. या सगळ्या बाबतीत सरकारने उत्तर दिले पाहिजे. मराठा समाजाला जर खरंच भविष्याची काळजी असेल तर कुठल्याही या महाविकास आघाडीतील मंत्र्याला महाराष्ट्रात फिरता देता कामा नये, असे ते म्हणाले होते.
पुढे अनिल परबांवर टीका करताना ते म्हणाले की, त्या अनिल परबांच्या घराबाहेर एवढे पोलिस ठेवले आहेत की जसं काय त्याच्या डोक्यावर कोणीतरी डायमंड ठेवलाय आणि तो कोणीतरी उचलून घेऊन जाणार आहे. एका बाजूला तुम्हाला दारू पिणाऱ्या लोकांची चिंता आहे पण मराठा समाजातील मुलांच्या भविष्याची चिंता नाही.
अनिल परब हा कलेक्शन एजंट आहे तो मंत्री नाहीये. तो कुठल्याही ऍंगलने तुम्हाला मंत्री दिसतो का? नाक्यावर उभा राहिला तर कोणीतरी वर्गणी देऊन जाईल त्याला. अशा माणसाकडून तुम्ही एसटीचं भलं होईल अशी अपेक्षा कशी ठेवता. तो कारकून आहे मातोश्रीमधला, अशी जहरी टीका त्यांनी त्यावेळी केली होती.
पुढे ते म्हणाले की, त्याला जर तुम्ही मंत्रीपदाची जबाबदारी दिली तर असंच होणारे. उद्धव ठाकरेंवर टिका करताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नाहीत. बाळासाहेब वेगळे होते. उद्धव ठाकरे हे वापरा आणि फेकून द्या या चौकटीतले आहेत. शिंदे साहेबांनी वाट पाहू नये अशी मी त्यांना विनंती करतो.
फार चांगलं काम करतायत ते. वय घालवू नका, श्रीकांतपण वयाने वाढतोय. आमच्या बाजूला बसवा, आम्ही दुप्पट मतांनी निवडून आणू. माझी अशी इच्छा आहे की एवढा चांगला नेता आहे. बाळासाहेबांच्या पठडीतून तयार झालेला एक कडवट शिवसैनिक आहे.
आज शिंदे साहेबांना दोन वर्षे झाले वेटींगला ठेवलं आहे. ते मुख्यमंत्री व्हायला हवे होते. जर पुन्हा मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर हे आदित्य ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो तिथे काही आयुष्य नाहीये. भाजपमध्ये या आणि आयुष्य सुखकर करा, असे नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. आता या वक्तव्याची पुन्हा चर्चा होत आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे की भाजपने ऑफर दिल्यामुळेच एकनाथ शिंदेनी हे बंड पुकारले असावेत.
महत्वाच्या बातम्या
मैत्रीचा भयानक शेवट! मित्राला वाचवायला गेला पण दोघेही…; काळजाचं पाणी करणारी घटना..
शिवसेना भाजप एकत्र येण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत:च दिले होते संकेत; तेव्हा शिंदे म्हणाले होते ठाकरेंचा आदेश…
महाविकास आघाडीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आमदारांना १२ जूलैपर्यंत अपात्र ठरवता येणार नाही
खरा हिरो! ५ वर्षांपुर्वी दिलेले वचन केले पुर्ण, रणदीप हुड्डाने सरबजीतच्या बहिणीच्या पार्थिवाला दिला खांदा