Share

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; राणेंचा राऊतांवर गंभीर आरोप

sanjay raut

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यात आता भाजप नेते नितेश राणेंनी आणखी भर टाकली आहे.

नितेश राणे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी शब्दात निशाणा साधला आहे. ‘संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे,’ असं नितेश राणे यांनी म्हंटलं आहे. सोमवारी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते याबद्दल बोलत होते.

यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘राऊतांनी ठाकरेंचं घर फोडलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावण्यामध्ये जे काही व्यक्ती पुढे होते त्यात संजय राऊत होते,’ असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. नितेश राणे एवढ्यावरच थांबले नाहीतर पुढे बोलताना देखील त्यांनी जहरी टीका केली आहे.

‘आता संजय राऊतांची मजल छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेलीय,’ अशी जहरी टिका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. ‘उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवणे “हे काय नवीन नाही,’ असं त्यांनी म्हंटलं आहे. मुख्यमंत्र्यांवर विश्वास करण्याआधी संभाजीराजे यांनी विचार करायला हवा होता,” असं त्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, ‘संभाजीराजेंना जो मानसन्मान भाजपाने दिला, देवेंद्र फडणवीसांनी दिला, भाजप नेत्यांनी दिलाय, ‘असंही देखील नितेश राणे म्हणाले. तर दुसरीकडे नितेश राणेंनी केलेल्या आरोपांवर अद्याप शिवसेना नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. राजकीय वर्तुळाचे लक्ष आता शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियेकडे लागलं आहे.

राज्यात भाजपला डावलून ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राणे पिता – पुत्र सातत्याने ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत. नितेश राणे, निलेश राणे संजय राऊत यांना घेरत आहेत. अलीकडे राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
काहीही झालं तरी भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे, IPL जिंकताच पांड्याचा आत्मविश्वास बळावला
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
पत्रकार परिषदेत गोंधळ; एकमेकांना मारहाण करत राकेश टिकैत यांच्यावर करण्यात आली शाईफेक
आयपीएल २०२२ च्या अंतिम सामन्यात फिक्सिंग? संजू सॅमसनवर चाहत्यांनी केले ‘हे’ आरोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now