संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहेत. राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कणकवलीमधील परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (nitesh rane photo went viral reading book in jail)
अशातच राणेंच्या अटकेनंतर सध्या त्यांचा पुस्तक वाचतानाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोची सत्यकथा समोर आली आहे. हा फोटो जुना असल्याची माहिती समोर आली आहे. राणेंना अटक केल्यानंतर पोलिस निरिक्षक शंकर कोरे यांनी पोलीस कोठडीतील सर्व व्यवस्थेची पाहाणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारणत: 5 वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर गोंधळ घातला होता. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, त्यावेळचा हा फोटो असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अटक झाल्यानंतर त्यांचा हा जुना फोटो लेटेस्ट फोटो म्हणून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तर दुसरीकडे कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. त्यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.
तसेच त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
या प्रकरणी आता न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली नीलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
देवोलिना भट्टाचार्यने ऑनस्क्रीन दीरासोबत केला साखरपुडा; पहा फोटो
टीम इंडिया ऑस्ट्रेलियन संघाचा धुव्वा उडवत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये, कर्णधाराची शतकी खेळी
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी; राहुल गांधी यांचा घणाघाती हल्ला
Budget 2022: सोप्या भाषेत बजेटमधील १५ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत