Share

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेसाठी हात खाली अन् ईडीची कारवाई होताच हात वर”

मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. यापूर्वी ईडीच्या पथकाने नवाब मलिकांची काही तास चौकशी केली होती. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (nitesh rane on nawab malik)

त्यानंतर नवाब मलिकांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने नवाब मलिकांच्या कोठडीसाठी कोर्टाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली आहे. आता नवाब मलिक यांच्या चौकशीवर महाविकास आघाडी सरकारने आक्षेप घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे यांची शरद पवार यांच्या घरी बैठक सुरू आहे.

नवाब मलिकांना अटक केल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यावर विविध प्रतिक्रिया येत आहे. या प्रकरणी भाजप नेतेही प्रतिक्रिया देत आहे. आता भाजप नेते नितेश राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये दोन फोटो असून एका फोटोत नवाब मलिक हात बांधून उभे आहे, तर दुसऱ्या फोटोत ते हातवर करुन घोषणा देत आहे. नितेश राणे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, छत्रपतींचा जयघोष करताना हातवर होत नव्हते, पण ईडीची कारवाई होताच लगेच हातवर केले. सध्या नवाब मलिकांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, नवाब मलिकांच्या समर्थनार्थ शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. तसेच नवाब मलिक यांनी ट्विटरवर ‘ना डरेंगे ना झुंकेंगे २०२४ के लिए तैयार रहिए, असे म्हटले आहे. कारवाई केल्यानंतर नवाब मलिकांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.facebook.com/471924039620091/posts/2881811271964677/?d=n

या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाब मलिक यांच्याकडे ईडीचे लोक आले होते. नवाब मलिक आणि महाविकास आघाडीच्या विरोधात ईडीची नोटीस येणार असल्याचे अनेक दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते, प्रवक्ते ट्विट करत होते. आज तो दिवस आला आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, भाजप महाविकास आघाडीविरोधात जे षडयंत्र रचत आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नोटीस आली नाही. तरीही ईडीने महाराष्ट्रातील एका मंत्र्याला थेट त्यांच्या कार्यालयात नेले आहे. भाजपने कोणते नवे राजकारण सुरू केले आहे. असे मी पहिल्यांदाच पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या-
नववधूच्या कारचा भीषण अपघात, नवरीसह दोन भावांचा जागीच मृत्यु; तीन दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
श्रीदेवीचा राग कमी करण्यासाठी अमिताभ बच्चनने पाठवली होती टेम्पोभर गुलाबाची फुलं
चित्रपटाची कथा लिहीण्यासाठी लेखकाने केले गुन्हे, सत्य समोर आल्यानंतर पोलिसही हादरले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now