राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गुरुवारी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.
अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. यामुळे आता हा वाद अधिकच वाढला आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1524963119470022656?s=20&t=jW8eOQU2wEKp6Zf3ve9P7Q
ट्विट करत नितेश राणे म्हणतात, “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” असं ट्वीट करत त्यांनी गर्भित इशारा केला आहे. सध्या राणे यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
याचबरोबर दुसऱ्या ट्विटमध्ये राणेंनी म्हंटलं आहे की, “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवरही टीका केली.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. महराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल इतकं लक्षात ठेवा.’
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे हे महाराष्ट्राला अशांत करण्याचं राजकारण ओवेसी बंधू करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र राज्यावर चाल करणारा २५ वर्ष रडत राहीला, त्याला यश मिळालं नाही, असही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
कंगना आता थेट बॉलिवूडवरच बरसली; म्हणाली, ईद पार्टीत सगळ्यांनी धाकडचे कौतुक केले पण..
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बोल्ड मैत्रीण चर्चेत; हॉट फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ
VIDEO: २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले होते मेजर संदीप, त्यांच्या शौर्याची कथा रुपेरी पडद्यावर
“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन