Share

नितेश राणेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं, फडणवीसांचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख करत म्हणाले…

uddhav thackeray and nitesh rane

राज्याच्या राजकारणात कधी कोणता मुद्दा चर्चेत येईल याचा अंदाज न लावलेलाच बरा..! आता चर्चेत आलेत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे. नितेश राणे यांनी केलेलं एक व्यक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे. नितेश राणेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

तसं पाहायला गेलं तर, नितेश राणे हे नेहमीच आपल्या बेधडक व्यक्तव्याने चर्चेत असतात. अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. असं असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुहृदयसम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल, तर ते फडणवीस आहेत, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

त्यांच्या या व्यक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच श्रीरामपूर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी तरुण दीपक बर्डे याने एका मुस्लिम तरुणीशी लग्न केलं. मात्र, अद्याप दीपकचा शोध लागलेला नाहीये.

याच प्रकरणात नितेश राणेंनी आपलं लक्ष घातलं आहे. याच प्रकरणाविरोधात आज श्रीरामपूरमध्ये राणेंच्या नेतृत्वात येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा केला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

वाचा नितेश राणेंनी काय म्हंटलय..?
नितेश राणेंनी म्हंटलं आहे की, ‘आपण काही जण हिंदुह्रदयसम्राट असल्याचे बॅनरसहित फोटो लावतात. पण तुम्ही माझी भावना विचारली, तर ‘हिंदुहृदयसम्राट’ ही पदवी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कुणाला द्यायची असेल तर ती फडणवीस यांना द्यायला हवी, याचे कारण असे की, त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे.’

दरम्यान, गेल्या अनेक दशकांपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसैनिकांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी ओळख आहे. मात्र आता आता नितेश राणे यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. आता यावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येतीये? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now