Share

नितेश राणे यांना आपल्याच मतदार संघातील गावात जाण्यास बंदी, धक्कादायक कारण आले समोर

nitesha rane

राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरुन वाद सुरु आहे. या वादात भाजपचे अनेक नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहे. त्यात भाजप नेते नितेश राणे यांचे नावही चर्चेत आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. (nitesh rane ban in anandwadi)

आता नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेत आले, पण यंदाचे कारण जरा वेगळे आहे. एका गावातील सभेत त्यांनी गावाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे याप्रकरणी गावकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे, तसेच त्यांनी नितेश राणेंविरोधात बॅनरही लावले आहे.

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नितेश राणे यांनी एका गावाबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गावकऱ्यांनी नितेश राणेंना गावात प्रवेश बंदी केली आहे. तसेच याबाबतचे बॅनरही लावण्यात आले आहे. सिंधुदुर्गात हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे.

आनंदवाडी हे नितेश राणे यांच्या मतदार संघातील गाव आहे. हे गाव देवगड तालुक्यात आहे. या गावात नितेश राणेंकडून कमळ चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाबद्दल बोलताना तरुण चोरामाऱ्यांच्या प्रकणात असल्याचे वक्तव्य केले होते. यावरुन गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

गावकऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर २२ एप्रिलला रात्री आनंदवाडी गावाची बदनामी कऱणारे वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करत नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, गावकऱ्यांच्या या निषेधावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला ही माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती. कमळ चषक स्पर्धेच्या भाषणावरुन सगळ्यांनी गैरमसज करुन घेतला आहे. मी जो काही चोरीचा आरोप केला आहे. त्यात काही मुले आनंदवाडीतील आणि काही मुले कणकवणीतील आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवत आहात? ‘या’ खास Tricks वापरा आणि बिलाची रक्कम अर्ध्यावर आणा!
..अन् उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले; वाचा नेमकं काय घडलं
शिवाजी महाराजांविषयी सखोल अभ्यास करून त्यावर अमित शाह यांनी पुस्तक लिहिले- देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now