Share

नवाब मलिकांनंतर आता सुप्रिया सुळेंचा नंबर? लवासा संदर्भातील भाजप नेत्याच्या ट्विटने उडाली खळबळ

ईडीने अटक केल्यानंतर दोन दिवसांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांना कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. (nilesh rane tweet on supriya sule)

बुधवारी नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांकडून मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याशिवाय ईडी मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणाचाही तपासही त्यांच्याविरोधात सुरु आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास ईडीच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता. आठ तास चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली होती.

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर राज्य सरकारमधील नेते नवाब मलिकांच्या समर्थनार्थ उतरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहे.

भाजप महाविकास आघाडीविरोधात जे षडयंत्र रचत आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. नोटीस आली नाही. तरीही ईडीने महाराष्ट्रातील एका मंत्र्याला थेट त्यांच्या कार्यालयात नेले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. आता यावरुन त्यांनी भाजप नेते निलेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे नवाब मलिकांची इतकी बाजू घेताय हे पाहून आश्चर्य वाटले. पण दुसऱ्या बाजूला लवासा प्रकल्पामध्ये तुमचा काय सहभाग होता हे देखील तपासावं लागेल, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1497214735883771904?t=yH1AUgvCfaBwH3KS1AnvWg&s=08

खासदार सुप्रिया सुळे आपण दाउदच्या एका साथीदाराची इतकी बाजू घेत आहात हे बघून आश्चर्य वाटतं, दुसऱ्या बाजूला तुमचा लवासा प्रकल्पामध्ये काय सहभाग होता हे देखील तपासावं लागेल. तिकडचा शेतकरी बोलका नसला तरी प्रकरण अजून संपलेलं नाही, असे ट्विट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी हा सुप्रिया सुळेंना दिलेला इशारा असल्याचेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या नव्या फॉर्मेटमध्ये संघांची दोन गटांत विभागणी; पहा मुंबई इंडीयन्स कोणत्या गटात..
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..
‘या’ सेलिब्रिटींच्या मुलांची नावं आहेत खुपच युनिक आणि मॉडर्न, तुमच्या मुलांनाही देऊ शकता अशी नावं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now