Share

nilesh rane : राणेंना नियम कायदे कळत नाहीत; स्वतः निलेश राणेच असं का म्हणाले? वाचा…

nilesh rane

nilesh rane talking about rane family  | सिंधुदुर्ग जिल्ह्यात हनुमंत गड आहे. हा गड शिवकालीन आहे. या गडावर सह्याद्री प्रतिष्ठानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीणोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला परशुराम गंगावणे, भाजप नेते निलेश राणे हे उपस्थित होते.

आता नववर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकजण पार्ट्या करत असतात. काही लोक तर गडावर जाऊन दारुही पितात. अशा लोकांना आता निलेश राणे यांनी इशारा दिला आहे. गडावर कोणी दारुच्या बाटल्या आणल्या तर त्याला बाटली सकट खाली फेकून देऊ, असा दम त्यांनी दिला आहे.

त्यामुळे आता ३१ डिसेंबरला गडावर दारुच्या पार्ट्या करणाऱ्यांवर शिवभक्त नजर ठेवणार आहे. तसेच पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले की, गडकिल्ले हे आमचं दैवत आहे. मी पहिल्यांदा खासदार झालो होतो तेव्हा मी केंद्र सरकारला आधी सांगितलं होतं की, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गासाठी पैसे द्या.

आपल्याला वेडंच छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. शिवभक्त हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेडा असतो. राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात शिवाजी महाराजांचा कार्यक्रम असला तरी शिवभक्त त्याला येणारच, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

राणेंना जसे कायदे नियम कळत नाही, तसे शिवभक्तांनाही कायदे नियम कळत नाही. शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या गडकिल्ल्यांवर  कोणी वाकड्या नजरेने पाहू नये हेच शिवभक्तांना हवं असतं, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी स्मारकाला मानाचा मुजरा केला होता.

अफजल खानाचं थडगं तोडायला परवानगी मागितली नाही. कारण सरकार आपलं आहे. महाराष्ट्रात आपल्यासारखी लोकं असेपर्यंत कोणाची परवानगी मागणार नाही. शिवभक्ताने जे मागितलं ते सरकारने दिलं नाही, तर ते राणे कुटुंब शिवभक्ताला देईल, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘शरीरावर एकही कपडा उरला नव्हता’; भूमी पेडणेकरने सांगीतला इंटिमेट सीन करतानाचा भयानक अनुभव
Video: स्टेजवर मेव्हण्याने धरला मेहुणीचा हात, पुढे जे झाले ते तुम्ही बघूच शकत नाही…
अनंत अंबानींनी १५ दिवसात १०८ किलो वजन कसे केले कमी? अखेर गुपित फुटलेच; वाचून धक्का बसेल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now