शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये जमिनीचे ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट या संपत्तीचा समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईनंतर आता भाजप विरुद्ध शिवसेना अस शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून शिवसेना तसेच संजय राऊत यांच्यावर ते टीका करत आहेत. राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत तडफडतायत. पण झालं ते योग्य झालं. हे होणारच होतं. राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही कारवाई होऊ शकते. त्यांनाही काळापैसा जमा केला असेल. आज ना उद्या बाहेर पडणार आहे,” असं निलेश राणे म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना निलेश राणे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. “आता स्पष्टता देण्याचं काम राऊतांचं आहे. कुठून आला हा पैसा? फक्त सामानाचा पगार घेऊन? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहे. मनी लॉन्ड्रींग कायद्याअंतर्गत हा पैसा आला कुठून याचा पुरावा आता राऊतांना द्यावा लागेल,” असंही निलेश राणे म्हणाले.
तसेच राऊतांवर झालेल्या कारवाईवर बोलताना निलेश राणे म्हणाले, ती संपत्ती आहे हे कशावरुन? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा काळा पैसा आहे असं मी समजतो. जे काय सापडलंय ते ईडीलाच माहिती. पण आज ना उद्या हे राऊतांसोबत होणारचं होतं, असेही ते म्हणाले.
वाचा ईडीच्या करवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत.. या कारवाई माध्यमांशी बोलताना संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. राऊत म्हणाले, ‘तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या
त्याला लाज नाही वाटत बाळाला पोटाशी बांधून.., प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
..तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करू, ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊत मोठे वक्तव्य
..त्यामुळे सागर कारंडेने लोकलच्या ट्रेनमधून धक्के खात केला प्रवास, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर