गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. अखेर तो आता संपला असून राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. (nilesh rane share shocking video about ajit pawar)
निवड झाल्यानंतर अजित पवारांनी सर्वांचे आभार मानले आहे. यावेळी अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जोरदार टीकाही केली आहे. पण सर्वात जास्त ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या भाष्यामुळे चर्चेत आले आहे.
आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी नारायण राणे यांचा शिवसेनेत असतानाच्या दराराबाबत भाष्य केले आहे. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप नेते निलेश राणे यांनी यावर एक ट्विट केले आहे. यावेळी अजित पवारांचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
अजित पवारांच्या आपण पाया पडायला सुद्धा तयार आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. आम्हाला दुसरं काहीही नको, आमच्या माणसाला मानसन्मान दिला, बदल्यात तुमच्या पाया पण पडू, असे कॅप्शन निलेश राणे यांनी व्हिडिओला दिले आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1543979471119605760
व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणातात की, राणेंच्या वेळेस दरारा होता. त्यांनी नुसतं मागे बघितलं की सगळी चिडीचुप व्हायचे. सगळे खाली बसायचे. असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कोणाचा बघितला नाही. मात्र राणेंनी तो दबदबा स्वत: निर्माण केला होता. तसेच यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहमती दर्शवताना दिसून येतात.
हा व्हिडिओ निलेश राणे यांनी पोस्ट केला आहे. नारायण राणे यांना मानसन्मान दिल्यामुळे त्यांनी आभार मानले आहे. तसेच आपण आता पाया सुद्धा पडायला तयार आहे, असे निलेश राणे यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सध्या निलेश राणे यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
रश्मिकाच्या हातात ‘ती’ गोष्ट पाहून घाबरली होती तिची आई, स्वत: रश्मिकाने सांगितला किस्सा
“सगळे सोबत आहात ना रे बाबांनो…”, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना फोन, वाचा काय म्हणाले?
महाराष्ट्रात झालेली ही राजकीय खेळी कोणी आणि कधी खेळली? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा