Share

शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजींच्या घराचा पोटमाळा अनधिकृत, राणेंनी केला गंभीर आरोप

राज्यात सध्या मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालिसाच्या पठणावरुन वाद सुरु आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे सांगितले होते. पण त्यानंतर त्यांनी जाण्याचा निर्णय रद्द केला होता, पण तरीही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (nilesh rane on 92 yeard old women chandrabhaga)

राणा दाम्पत्यांनी इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. मातोश्री बाहेर शुक्रवार पासूनच पोलिसांचा कडेलोट बंदोबस्त असल्याचे दिसून आले. अशात मातोश्रीच्या बाहेर असलेल्या शिवसैनिकांमधल्या एक ९२ वर्षांच्या आजी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. चंद्रभागा असे त्या आजींचे नाव आहे. त्या आजींनी राणा दाम्पत्याला इशारा दिला होता.

आता त्या चंद्रभागा आजींवर भाजप नेते निलेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. चंद्रभागा आजींचा पोटमाळा अनधिकृत असल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या आजींच्या घरातील फोटो ट्विट करत निलेश राणे यांनी हा आरोप केला आहे.

ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्याला व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही, पळून जाल मुंबई सोडून, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

निलेश राणेंच्या या गंभीर आरोपांमुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. त्या गरिबांचा माळा दिसला ? तुम्हा सगळ्या भाजपा ते काँग्रेस मधील सगळ्या नेत्यांच्या बेकायदेशीर प्रॉपर्टी आधी बाहेर काढल्या पाहिजे. मग आम्हा गरीबांनी बेकायदेशीर का असेना पण कष्टाच्या पैशाने बांधलेला माळा पाडा, असे एका युजरने म्हटले आहे.

तरुणाने केलेल्या ट्विटला भाजप नेते निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे. त्या ट्विटला उत्तर देत ते म्हणाले, माझं म्हणणं तेच आहे जो न्याय आजीला आहे. तोच न्याय सगळ्या गरिबांना मिळावा, गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला तेव्हा कोण त्यांच्या घरांसाठी बोललं नाही आणि दुसरं ठराविक नेत्यांचीच कशाला सगळ्या नेत्यांची अनधिकृत घरं पाडून टाका पण गरिबाचं घर पडता कामा नये.

महत्वाच्या बातम्या- 

फिनीशर धोनीला ‘या’ खेळाडूने रोखले, शेवटच्या 6 चेंडूत करून दिल्या नाहीत 27 धावा,

धोनीची पत्नी साक्षीने वीज कपातीबाबत सरकारची केली पोलखोल, ट्विट करत विचारले ‘हे’ प्रश्न

इरफान पठानने घडवला उमरान मलिकपेक्षा खतरनाक गोलंदाज, पोलिसाची नोकरी सोडून बनला क्रिकेटर

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now