Share

”कोणत्या तोंडाने अजित पवार आंदोलन करत आहेत, स्वत: ही तात्पुरते बाहेर आहेत”

मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा विरोध दर्शवत आज उपमुख्यमंत्री अजित पवारसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवत सकाळी १० वाजल्यापासून महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसले आहेत.

या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत, “कोणत्या तोंडाने अजित पवार आंदोलन करत आहे. स्वत: ही तात्पुरते बाहेर आहेत.” अशी टीका अजित पवार यांच्यावर केली आहे.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1496767304163467270?t=UIglG1biGDQG4y8SK1Ku6w&s=19

निलेश राणे यांनी “कुठल्या तोंडाने अजित पवार नवाब मलिक च्या समर्थनात आंदोलन करत आहेत?? स्वतः तात्पुरते बाहेर आहेत.” अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यांच्या या टीकेवर अद्याप अजित पवार यांनी प्रतीक्रिया दिलेली नाही.

बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगत सक्तवसुली संचालनालयाने मलिक यांना अटक केले आहे. मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटले आहेत. अटकेचा निषेध नोंदवत आज महाविकास आघाडीने भाजपच्या दडपशाहीविरोधात आंदोलन केले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर आरोप करत, “कोणत्याही मंत्र्याचे नाव दाऊदसोबत जोडले की त्याची बदनामी करायला सुरूवात करतात. नवाब मलिकांनी काहीही चुकीचे केलेले नाही. भाजपा अनेक नेत्यांना धमकावत आहे. दाऊदचे संबंध मुद्दाम मलिकांसोबत जोडले जात आहेत, असे आरोप भाजपावर केले.

मुख्य म्हणजे शुक्रवारी भाजपच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात येईल. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
बंदूकीच्या धाकावर टेलिव्हीजन क्वीन एकता कपूरचे अपहरण, व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
‘नवाब मलिक जबरदस्तीने मुलींकडून करून घ्यायचे ‘हे’ काम, माझ्याकडे व्हिडीओ’, भाजप नेत्याचा दावा
त्यांनी कायदेशीर मार्ग स्विकारला आहे त्यामुळे.., पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मांजरेकरांची प्रतिक्रिया
..त्यावेळी माझं रक्त पिणारा मच्छर देखील तडफडून मरायचा, संजय दत्तचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

 

राजकारण

Join WhatsApp

Join Now