Share

‘हे होणारच होतं… भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले??,’ राणे थेट पवारांवर बरसले

sharad pawar

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा असल्याच जाहीर केलं होतं. मात्र आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याच पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं होतं की, ‘संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारुन निवडणूक लढवावी.’

तर दुसरीकडे याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विट करत निलेश राणे यांनी थेट शरद पवारांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. सोबतच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील जहरी शब्दात निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमधी म्हंटलं आहे की, ‘हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?? राजे जर शिवसेने सोबत जाणार तर संज्या दुसऱ्या सीट वर आहे ज्याने मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका.’

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. आता ही निलेश राणे यांनी पवारांच्या बदलत्या भूमिकेला लक्ष करत ट्विट केलं आहे. यावर अद्याप राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीये.

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अद्यापही चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला होता. पवारांनी सांगितले होते की, ‘मविआतील पक्षांशी अद्याप चर्चा केली नाही, पण राष्ट्रवादी पक्षापुरतं सांगायचे झाल्यास आमचा एक प्रतिनिधी निवडूण यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. प्रत्येक पक्षाची मतसंख्या आहे, त्यावर हा निकाल आहे.’

पुढे पवार म्हणाले होते की, ‘राष्ट्रवादी पुरतं म्हणायचं तर आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर आमच्याकडे १०-१२ मते अरिरिक्त उरतात. ती आम्ही संभाजीराजेंना देऊ, असे शरद पवारांनी सांगितले होतं. मात्र आता पवारांच्या भूमिकेत बदल झाल्याच पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला ड्रेस घालून उर्फी पोहोचली पार्टीत, युजर्स म्हणाले, ‘ही बसणार कशी?’
ब्राम्हण संघटनांनी घेतली शरद पवारांची भेट, केल्या ‘या’ तीन मागण्या; शरद पवार म्हणाले…
सोपा झेल सोडला आणि डीआरएसही नाही घेतला, चाहत्यांनी पंतचा घेतला खरपूस समाचार, म्हणाले..
भुल भुलैयासमोर चित्रपट फ्लॉप झाला तरी कंगनाने केले कार्तिक आर्यनचे अभिनंदन, म्हणाली…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now