Dipak Kesarkar: १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करा; केसरकरांच्या लोटांगणानंतरही राणे आक्रमक

nilesh rane criticize dipak kesarkar | शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे नेते दीपक केसरकर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी सुरुवातीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली, त्यात राणेंचा मोठा वाटा होता, असे केसरकर म्हणाले होते.

त्यानंतर राणे पुत्र आणि दीपक केसरकर यांच्यात वाद सुरु झाल्याचे दिसून आले. भाजप नेते निलेश राणे दीपक केसरकरांवर टीका करत आहे. आता निलेश राणे यांनी एक ट्विट करुन दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. ज्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती आणखी बिघण्याची शक्यता आहे.

दीपक केसरकर म्हणतो की मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता दीपक केसरकर यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दीपक केसरकर यांनी याआधी मी नारायण राणेंचा उल्लेख करणार नाही, असे म्हटले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे दीपक केसरकर यांना एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून तंबी मिळाल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांचे प्रवक्ते पद सुद्धा जाण्याची शक्यता आहे.

दीपक केसरकर यांच्याकडून लवकरच शिंदे गटाचे प्रवक्तेपद काढून घेतले जाऊ शकते. तसेच त्यांच्याऐवजी किरण पावसकर यांना प्रवक्तेपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. जर असे काही झाले, तर केसरकर विरुद्ध राणे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

तसेच निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावरही निशाणा साधला होता. सगळी पदे ठाकरे स्वत:कडेच ठेवणार तेव्हा विचार करा, यांना किती साथ द्यायची. उद्धव ठाकरे यांच्यापासून तेजस ठाकरेंपर्यंत यांना केवळ ठाकरे आडनावामुळेच सर्वकाही मिळाले आहे, बाकी यांचे कर्तृत्व शुन्य आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेचे ‘हे’ दोन नेते मातोश्रीवरच एकमेकांना भिडले; उद्धव ठाकरे दोघांनाही खडसावत म्हणाले…
रोजची १२ किमी पायपीट, कोरोनावर मात, रौप्य पदक विजेत्या अविनाशच्या वडिलांनी सांगितली पडद्यामागची कहाणी
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेवरही कब्जा; स्वतःला शिवसेना तर बाकीच्यांना उद्धव ठाकरे गट संबोधले