Share

दादागिरी आली अंगलट! पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

nitesh rane

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे हे सध्या अडचणीत सापडले आहेत. नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. त्यावेळी निलेश राणे यांनी पोलिसांसोबत वाद घालत जाब विचारला. यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.

तसेच त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

या प्रकरणी आता न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली नीलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने मंगळवारी नितेश राणे यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. आता राणे हे जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

तर जाणून घेऊ या संतोष परब हल्ला प्रकरण नेमकं काय आहे. १८ डिसेंबरला कणकवलीत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना मारहाण झाली. परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली.

यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी देखील भाष्य केले. ते म्हणाले,“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा लीक झाली होती सलमान खानची ऑडिओ टेप, प्रिती झिंटासोबतच्या नात्याची झाली होती चर्चा
‘तुमचे हात शिख आणि काश्मिरी लोकांच्या रक्ताने रंगले आहेत’, राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटवर फिल्ममेकर भडकले
‘बोर्डात माझी ओळख नव्हती म्हणून मी कर्णधार होऊ शकलो नाही’, हरभजनचे BCCI वर गंभीर आरोप
..त्यानंतर संपूर्ण पराभवाचा दोष माझ्यावर टाकण्यात आला, आता हार्दिक पांड्याने केले गंभीर आरोप

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now