Share

वसंत मोरेंनी करून दाखवलं! राजीनामा दिलेल्या समर्थकाला राज ठाकरेंकडून हवं ते मिळवून दिलं

गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे मनसेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे पण वसंत मोरे यांनी ह्या सगळ्या अफवा असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. आता पुन्हा त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे ज्यामुळे हे पुन्हा सिद्ध झाले आहे की वसंत मोरे मनसेशी एकनिष्ठ आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा होत होती. त्यानंतर पक्षाचे माथाडी सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी वैतागून पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांवर अनेक आरोप लावले होते.

असं म्हणलं जातं की, निलेश माझीरे हे वसंत मोरेंचे कट्टर समर्थक आहेत. पण त्यांनीच राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण वसंत मोरेंनी पुन्हा त्यांना पक्षात आणले असून राज ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांना पुन्हा त्यांचे पद देण्यात आले आहे. याचा एक फोटोही वसंत मोरेंनी शेअर केला आहे ज्यामध्ये राज ठाकरे निलेश माझीरे दिसत आहेत.

राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. काही दिवसांपुर्वी वसंत मोरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले  होते की, जोपर्यंत राज ठाकरे येत नाहीत तोपर्यंत शहर कार्यालयात पाऊल ठेवणार नाही. त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप केले होते.

जेव्हा राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका मांडली होती त्यानंतर त्यांनी या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना पुणे मनसेमधून बाहेर फेकल्याचे बोलले जात होते. या सर्व प्रकारानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि राजकारण तापलं होतं.

पायउतार झाल्यापासून वसंत मोरे वारंवार शहरातील मनसे नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यातच निलेश माझीरे यांचा राजीनामा हा पुणे मनसेसाठी फार मोठा धक्का मानला जात होता. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी काही दिवसांपुर्वी निलेश माझीरे यांची भेट घेतली होती त्यामुळे असं बोललं जात होतं की ते शिवसेनेत सामिल होतील. पण वसंत मोरे आणि राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी पुन्हा पदाचा कार्यभार स्विकारला.

महत्वाच्या बातम्या
मंत्र्यांसमोरच तुफान राडा; भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण
राज्यसभा निवडणूकीत MIM चं ठरलं; भाजपही नाही अन् शिवसेनाही नाही, ‘या’ पक्षाला देणार पाठींबा
बिग ब्रेकींग! काँग्रेसने ‘मविआ’चा हात सोडला; ‘या’ निर्णयामुळे शिवसेनेला बसणार फटका
‘या’ कारणामुळे भाजपने पंकजा मुंडेना पुन्हा डावलले; निवडणुकीच्या दिवशीच समोर आले गुपित

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now