मंगळवारी (काल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर हल्लाबोल चढवला. शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी, भाजपा नेते, किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच संजय राऊतांनी गंभीर आरोप देखील केले आहेत.
राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचाच धागा पकडत भाजपनेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले, आज संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं.
तसेच पुढे बोलताना नीलेश राणे म्हणाले, आज संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं. तिथे महिला पत्रकार पण होत्या त्यांच्यासमोर ही भाषा वापरणे कितपत योग्य आहे. त्या पत्रकारांपैकी एका महिलेनेच संजयच्या विरोधात तक्रार करावी नाहीतर हा सुधारणार नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला . महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दांगी करुन आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, असे राऊत म्हणाले आहेत.
तसेच यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपवर केले आहे. भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राऊत यांनी अत्यंत जहरी भाषेत सोमय्यांवर टीका करताना त्यांनी आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप केला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज (mohit kambhoj) यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच मोहीत कंबोज हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन डुबणार असल्याचा दावाही केला.
महत्त्वाच्या बातम्या
“संजय राऊतांना गरज लागली तेव्ही मी आर्थिक मदत केली”; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
‘या फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहत्यांचे वाढले टेन्शन, पहा फोटो
बाॅलीवूडवर कोसळला दुखा:चा डोंगर! डिस्को म्युझिक आणलेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे निधन
VIDEO: मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानंतर अर्जुन तेंडूलकरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..