Share

सदावर्तेंपासून राणांपर्यंत सर्वांना आवरा, आधुनिक पेशवे त्यांना रसद पुरवताहेत; निखिल वागळे संतापले

राज्यातील हनुमान चालिसा वाद वाढत चालल्याचे दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. असे असतानाही मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. (nikhil wagale criticize navneet rana

नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याप्रकरणी वेगवेळ्या प्रतिक्रियाही अनेकजण देत आहे. आता यावर जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुद्धिवंतांचा महाराष्ट्र बाजारबुणग्यांचा कधी झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बुद्धिवंतांचा महाराष्ट्र बाजारबुणग्यांचा कधी झाला? भिडे-सदावर्तेपासून राणांपर्यंत सगळ्या नतद्रष्टांना आवरा. राज्याचा सन्मान ते धुळित मिसळत आहे आणि आधुनिक पेशवे त्यांना रसत पुरवताहेत, अशी प्रतिक्रिया निखिल वागळे यांनी दिली आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केल्याप्रकरणी अटकेची कारवाई झाली आहे. कलम १५३ (अ) च्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणांच्या मुंबईतल्या घराबाहरे खुप गर्दी होती, पण चोख पोलिस बंदोबस्तात त्यांना खार पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी राणा दाम्पत्याला खार पोलिस ठाण्यात नेत्यातच नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मदतीचे आवाहन केले होते.

सध्या शिवसैनिक खुप आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. ते नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात आंदोलन करताना दिसून आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. पण तिथेही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जखमी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुंबई पोलिस आणि उद्धव ठाकरेंच्या संगमताने हा हल्ला झाला, सोमय्यांचा गंभीर आरोप
शरद पवारांनी थेट अमित शहांना सुनावलं, म्हणाले, तुमच्या हातात सत्ता असून तुम्हाला..
ब्रेकिंग! खार पोलिस स्टेशनबाहेर शिवसैनिकांच्या हल्ल्यात किरीट सोमय्या जखमी, गाडी फोडली

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now