प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अनेक जणांनी मिळून त्याच्यावर सुमारे 25-30 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सिद्धू मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
त्यांचे जगभरात अनेक चाहते आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या अचानक झालेल्या मृत्युने त्यांच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यांचे जुने व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रु अनावर होतं आहे.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ पाहून तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली देताना आंतरराष्ट्रीय रॅपरला रडू आवरलं नाही. भर स्टेजवर त्यांना सिद्धू मुसेवाला यांच्या आठवणींनी रडू कोसळलं आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक नायजेरियन रॅपर आणि गायक बर्ना बॉय स्टेजवर लाईव्ह शोदरम्यान ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहे. स्टेजवर असताना बर्ना बॉयने दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाला श्रद्धांजली वाहिली आहे.
https://www.instagram.com/reel/CeXh1coDBt0/?utm_source=ig_web_copy_link
मात्र त्याचवेळी तो प्रचंड भावुक झाला. या व्हिडिओमध्ये बर्ना बॉय सिद्धू मूसेवालाचं नाव घेतो आणि ढसाढसा रडू लागतो. त्यानंतर बर्ना बॉय हा बॉयने दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाला यांची हूकस्टेप देखील करतो. तुम्हीही नक्कीच सिद्धू मूसेवालाला यांच्या हूकस्टेपचे दिवाणे असालं.
दरम्यान, एका हाताने पायावर मारून सिद्धू मूसेवालाला हे हात वर करायचे आणि ‘दिल दा नी माडा, सिद्धू मूसेवाला,’ ही ओळ म्हणायचे. सध्या सोशल मिडियावर अनेकांना बर्ना बॉय याचा हा व्हिडिओ भावला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.