Share

१२ सामन्यात फक्त ८५ धावा, ४ वेळा शुन्यावर आऊट, तरीही मिळवले तब्बल ११ कोटी; खेळाडू चर्चेत..

आयपीएलच्या लिलावात यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनला लॉटरी लागली आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती. निकोलस पूरन वेस्ट इंडिजच्या संघाचा खेळाडू आहे. (nicholas pooran sold 10 crore)

निकोलस हा डावखुरा फलंदाज आहे, तसेच विकेटकीपिंग करतो. तसेच तो एक चांगला क्षेत्ररक्षक. वेगवान पद्धतीने खेळणारा खेळाडू ही त्याची ओळख आहे. आयपीएल लिलावात निकोलस पूरनला विकत घेण्यासाठी जोरदार स्पर्धा लागली होती. त्याच्यासाठी तीन संघांनी बोली लावली आणि खडतर स्पर्धेनंतर हैदराबादने अखेर त्याला आपल्या ताफ्यात घेतले आहे.

२६ वर्षीय निकोलस पूरन आयपीएल २०२१ मध्ये सपशेल अपयशी ठरला होता. त्याला १२ सामन्यांत केवळ ८५ धावा करता आल्या. त्याची खेळण्याची सरासरी आठच्या आसपास होती. तसेच त्याला चार वेळा खातेही उघडता आले नाही. यानंतर पंजाब किंग्जने त्याला सोडले.

असे असतानाही त्याला यावेळी जोरदार बोली लागली आहे. हैदराबादने त्याच्यासाठी बोली लावली आहे. त्यानंतर सीएसकेने बाजी मारली. दोघांनी बोली लावली ४ कोटींची. त्यांची बोली पाच कोटींपर्यंत पोहोचली होती. ज्या पध्दतीने पूरन खेळतो, त्याचपद्धतीने त्याच्यावर बोली लावली जात होती.

पाच कोटी रुपयांनंतर, केकेआरने देखील पैज लावली. येथून चेन्नईने माघार घेतली. पण हैदराबादचा संघ ठाम राहिला आणि बोली सात कोटींच्या पुढे गेली. पण बोली थांबली नाही आणि पूरनचा आकडा १० कोटींच्या पुढे गेला. केकेआरने १०.५० कोटींची शेवटची बाजी लावली पण हैदराबादने १०.७५ कोटींची बोली लावून पूरनला आपल्या ताफ्यात घेतले.

निकोलस पूरनने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३३ सामने खेळले असून ६०६ धावा केल्या आहेत. ७७ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचा स्ट्राइक रेट १५४.९९ आहे. तसे पाहता, त्याची एकूण टी-२० कारकीर्द खूपच नेत्रदीपक आहे. त्याने २१४ टी-२० सामन्यांमध्ये ४११० धावा केल्या आहेत. येथे त्याच्या नावावर २० अर्धशतके आणि एक शतक आहे.

महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या दिवशीच खासदाराने १८ वर्षीय मुलीशी केले तिसरे लग्न, लग्नाचा फोटोही केला पोस्ट
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

खेळ

Join WhatsApp

Join Now