राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर विधान परिषदेसाठी 9 जूनपर्यंत अर्ज भरायचे आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच एका पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आपल्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी मिळावी म्हणून रक्ताने पत्र लिहिलं आहे. आता या नेत्याला संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा नेमकं काय प्रकरण..? इस्लामपूरचे नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या निशिकांत पाटील यांच्यासाठी आष्टा येथील प्रवीण माने या कार्यकर्त्याने हे पत्र लिहिले आहे. प्रवीण हे निशिकांत पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. निशिकांत पाटील यांना विधानपरिषद सदस्यासाठी संधी मिळावी, यासाठी प्रवीण माने यांनी हे पत्र लिहिले आहे.
प्रवीण यांनी हे पत्र थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या रक्ताने लिहून पाठवले आहे. राजकीय वर्तुळासह राज्यात या पत्राची तुफा चर्चा सुरू आहे. जाणून घ्या सविस्तर नेमकं प्रकरण काय..? वाचा प्रवीण यांनी पत्रात काय लिहिले आहे..?
दरम्यान, देश हिताचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यत पोहोचवण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली तर या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्याचा सन्मान होईल, असं त्यांनी पत्रातून म्हंटले आहे.
पुढे ते पत्रातून म्हणतात, ‘सध्या सुरु असलेला राजकीय संस्थांत्मक संघर्ष या निवडीमुळे संपून जाईल आणि भविष्यात या मतदारसंघातून विधानसभेमध्ये भाजपाचा आमदार पोहोचवण्यासाठी बळ मिळेल. तरी कृपया आपण आमच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,’ अशी विनंती त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील व्हाईट हाऊस ईडीच्या ताब्यात; अभिनेत्री अँजेलिना जोलीने देखील केले होते यामध्ये शूटिंग
‘आता काश्मीर सोडल्याशिवाय पर्याय नाही’; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा
अखेर केकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेच; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
फक्त मॅगी, सेक्सची जास्त मागणी, डोक्यावर केस नाहीत, भारतात घटस्फोटाची धक्कादायक प्रकरणे