रस्ते अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकांचा तर अपघातात जीवही जात आहे. असे असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथे झालेल्या एका अपघातात एका नववधूचा मृत्यु झाला आहे. तिचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. (newly married bride car accident)
लग्नानंतर सासरहून नववधू माहेरी जात होती, पण त्याआधीच तिने जगाचा निरोप घेतला आहे. लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघात झाला आहे. या अपघातात नवरीसह पाचजणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात शोककळा पसरली आहे.
साखरा येथील ज्ञानेश्वर पामलवाड यांची मुलगी पूजा हिचा विवाह १९ फेब्रुवारीला जारीकोट ता. धर्माबाद, जि. नांदेड येथील नागेश साहेबराव कन्हेवाड यांच्याशी झाला होता. लग्नानंतर नवरी-नवरदेव आपल्या गावाकडे परत गेले होते. मात्र रितीरिवाजाप्रमाणे नववधूला मांडव परतणीसाठी पुन्हा माहेरी आणण्यासाठी सोमवारी २१ फेब्रुवारीला माहेरकडील मंडळी गेली होती.
नववधू व नवरदेव यांना घेऊन ते सर्वजण एमएच २९ एआर ३२१९ क्रमांकाच्या वाहनाने साखरा गावाकडे येत होते. त्यावेळी मित्र सोमठाणा शिवारात चटलवार यांच्या ढाब्यासमोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. हिमायतनगरकडून नांदेडकडे विटा घेऊन निघालेल्या वाहनाने या कारला धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. यामध्ये नववधू पूजा पामलवाड, दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड हा सख्खा भाऊ, तर संतोष पामलवाड हा चुलत भाऊ जागीच ठार झाला आहे. तसेच यावेळी कारचालक सुनील धोटे याचाही मृत्यु झाला आहे.
मंगळवारी पूजा, संतोष, दत्ता यांच्या मृतदेहांना साखरा गावात एकाच चितेवर अग्नी देण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. वाहन चालक सुनील धोटे हा चालगणी येथील रहिवासी होता. त्याची आर्थितक परिस्थिती ठीक नव्हती, त्यामुळे तो गाडी चालवून कुटूंबाच उदरनिर्वाह करत होता.
सुनील धोटेनंतर त्याच्या कुटूंबात त्याची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. चालगणी गावात प्रत्येकाला कुणाच्याही अडचणीत रात्री-अपरात्री उठून तो मदत करायचा. रुग्णसेवक म्हणून सुनीलची ओळख होती. त्यामुळे सुनीलच्या जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
तसेच भोकरजवळ झालेल्या वाहनात नववधूचा जागीच मृत्यु झाला आहे. तर या अपघातात तिचा पती हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णलयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवाब मलिकांनंतर ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी धरला भारतीयाचा हात, दलीप सिंग यांना सोपवली मोठी जबाबदारी
करेक्ट कार्यक्रम! नोकरीचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला मनसेकडून चोप, पहा व्हिडीओ