राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कोणाला संधी देणार याकडे राज्याचे लक्ष लागलंय.
अखेर राज्यसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. अनिल बोंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आहे.
कायम रोखठोक वक्तव्यासाठी ते चांगलेच चर्चेत असतात. मात्र पुन्हा एकदा भाजपने मंत्री विनोद तावडे यांना डच्चू दिला आहे. काही दिवसापासून विनोद तावडे यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा तावडे यांचा पत्ता कट केला आहे.
शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेस पक्षाचे पी. चिदंबरम तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे. तसेच भाजप पक्षातील विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे आणि पियुष गोयल यांची देखील राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.
यासाठी उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना देखील उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी महाराष्ट्रामधून १९ सदस्य निवडले जातात. यामध्ये भाजप पक्षाचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेकडून तीन, काँग्रेस पक्षाचे तीन, रिपाईचे एक आणि अपक्ष एक असे १९ खासदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले
लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या ‘या’ बीअरला जगभरातून आहे प्रचंड मागणी; फायदे ऐकून बसेल धक्का
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार
मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण