Share

सावधान! डोक्यावर हेल्मेट असले तरी बसू शकतो २ हजार रुपयांचा दंड, वाहतुकीच्या नियमांत पुन्हा बदल

भारतीय रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंची सर्वाधिक संख्या लक्षात घेऊन सरकारने 1998 च्या मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली. ज्यामध्ये दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट नीट घातले नाही त्यांना तात्काळ 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की हेल्मेट न घातल्याबद्दल आधीच दंड आकारला जातो, मग त्यात विशेष काय आहे? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हेल्मेट तर आवश्यक आहेच पण आता त्यासोबत आणखी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. चला तर त्या जाणून घेऊया?

वास्तविक, दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले असले तरी ते उघडे पडल्यास त्याला 1000 रुपये दंड आकारला जातो. दुसरीकडे, जर हेल्मेटला बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स आयएसआय) प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला 1,000 रुपये दंड होऊ शकतो.

यासोबतच हेल्मेट नसतानाही चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, लाल दिवा ओलांडणे आदींवर 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. एवढेच नाही तर मंत्रालयाच्या नियमांनुसार देशात फक्त दुचाकी वाहनांसाठी बीआयएस प्रमाणित हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी आहे.

म्हणजेच बाईक-स्कूटर चालवताना फक्त आयएसआय मार्कचे हेल्मेट घालावे लागेल. त्यामुळे मोटार वाहन कायद्याच्या कलम 194D MVA अंतर्गत, तुम्हाला 1 हजार रुपयांचे चलन भरावे लागू शकते. दंडाची ही तरतूद इथेच संपत नाही, तुम्ही जरी हेल्मेट घातले असेल आणि डोक्याला बांधून ठेवणारी पट्टी घातली नसेल, तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

एकंदरीत, या प्रकरणाचा निष्कर्ष असा की, तुम्ही आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट घालून घरातून बाहेर पडता, आणि त्या हेल्मेटची पट्टीही बांधली नसेल तर तुम्हाला २ हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे डोक्यावर हेल्मेट असूनही तुमचे दोन हजार रुपयांचे चलन कापले जाणार आहे.

सरकार गेल्या काही काळापासून रस्ता सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत आहे, नियम मोडल्यानंतर तुम्ही वाहतूक पोलिसांशी कितीही वाद घातलात तरी काही सेकंदात तुमचे चालान कापले जाईल, हे लक्षात घ्या.अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानेही लहान मुलांच्या सुरक्षेचा विचार करून काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

नवीन नियमांनुसार आता त्यांना दुचाकीवरून मुलांना घेऊन जाताना विशेष हेल्मेट आणि हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच लहान मुलांसोबत प्रवास करण्यासाठी वाहनांचा वेग ताशी 40 किमी निश्चित करण्यात आला आहे, तो न केल्यास वाहन चालविण्याचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
जुन्यातला जुना मुळव्याध मुळासकट नाहीसा करण्यासाठी करा ‘हा’ घरघुती उपाय; दोनच मिनीटांत पोट साफ
भाजपात सदाभाऊंची अवस्था नटरंगासारखी; राष्ट्रवादीने पुन्हा डिवचल
‘मला माझ्या गुरूंचा फोन आला, ‘पुन्हा पक्षात ये,’ मनसेत होणार बड्या नेत्याची घरवापसी
“भारतात परिस्थिती ठीक नाही, भाजपकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न,” राहुल गांधींची घणाघाती टिका

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now