नवीन वाहतूक नियमांबाबत ताजी बातमी समोर आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी चालकांसाठी नवा नियम आणला आहे. यामध्ये चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवरून नेण्यासाठी नवीन सुरक्षा नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. (new traffic rule for children)
या नवीन नियमात दुचाकी चालकांना हेल्मेट आणि लहान मुलांसाठी हार्नेस बेल्ट वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाहनाचा वेग केवळ ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवला जाणार आहे. नवीन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास १००० रुपये दंड आणि ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते.
दुचाकीवर मागे बसणाऱ्या मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात एक नवीन नियम समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा नियम चार वर्षांपर्यंतच्या मुलांना लागू करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, वापरलेले सुरक्षा हार्नेस हलके, जलरोधक आणि ३० किलो भार वाहून नेण्याची क्षमता असणारे असावे.
प्रवासाच्या संपूर्ण कालावधीत मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी, ड्रायव्हरला दोन पट्ट्यांसह चाइल्ड सेफ्टी हार्नेस बांधावा लागणार आहे. या नवीन नियमात प्रवासादरम्यान क्रॅश हेल्मेट किंवा सायकल हेल्मेट घालणे आवश्यक असणार आहे. हेल्मेटबाबत जे नियम सरकारने नमूद केले आहे, त्या नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे.
मुलांसाठी हेल्मेट बनवण्यास केंद्राने निर्मात्यांना आधीच सूचित केले आहे. मुलांसोबत प्रवास करताना वाहनाचा वेग ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन नियमांचे हे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी करून नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये वाहनचालकांना सेफ्टी हार्नेस आणि क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता. हा नियम १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पत्नी खुप सुंदर आहे, तिला माझ्यासोबत नाही राहायचं; लग्नानंतर तीन दिवसातच पतीने उचलले मोठे पाऊल
टपाटप! अखेर हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन, पण ‘या’ आहेत अटी
VIDEO: अजय देवगनचा राग पाहून घाबरले आनंद महिंद्रा, ट्विटमध्ये खुलासा करत म्हणाले..






