udhav thackeray : सध्या राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे दसरा मेळावा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरे मेळावे पार पडणार आहे. मेळाव्याच्या आधी वातावरण निर्मिती केली जातं आहे. भेटीगाठींचे सत्र रंगले आहे.
अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. गायक आनंद शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे आता वेगळ्याच चर्चाना उधाण आलं आहे. आता एकनाथ शिंदेंविरोधात शिंदे मैदानात उतरणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली जातं आहे. अशातच एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या महितीनुसार, आनंद शिंदे यांच्या आवाजातील गाणं शिवतीर्थावर दुमदुमणार असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आनंद शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीदरम्यान या गाण्याबाबत निश्चित करण्यात आलं असल्याचं बोललं जातं आहे. विशेष बाब म्हणजे, या गाण्याद्वारे शिंदे गटावर टीका करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
दसरा मेळाव्याआधीच हे गाणं सोशल मीडियावर लवकरच शेअर करण्यात येईल, असं देखील बोललं जातं आहे. सर्वजण या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या शिवसेना नेमकी कुणाची याचा निकाल निवडणूक आयोगाच्या दरबारात असून लवकरच निकाल हाती येईल.
मात्र त्याआधी दसरा मेळाव्याद्वारे दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केले जाईल, असं बोललं जातं आहे. सध्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही गटात आरोप – प्रत्यारोपांचे जोरदार सत्र सुरू आहे. अशातच आता आनंद शिंदे यांची एंट्री झाल्याने या दसरा मेळाव्याला वेगळाच रंग येईल? असं बोललं जातं आहे.