Share

4 दिवसांपूर्वीच शिजला कट; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती आली समोर

sharad pawar

शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली.

आता यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे तपासादरम्यान या हल्ल्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास्थानाबाहेर हल्ला करण्यासाठी चार आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची रेकी केली होती.

विशेष याबाबत चार दिवसांपूर्वीच आझाद मैदान पोलिसांनी संबंधित गावदेवी पोलिसांना अलर्ट दिला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गुरुवारी उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर आम्ही पवार यांच्या घरात घुसून त्यांना जाब विचारू, असे चिथावणीखोर वक्तव्य अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

त्यानंतर पोलिसांकडून त्या दिवसापुरता बंदोबस्त सिल्व्हर ओकवर वाढवण्यात आला. मात्र, त्याच्या दोन दिवस आधीपासूनच पवारांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याची तयारी आझाद मैदानात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपासून पाणी, खाद्य वस्तू, पान, विडी, तर कुणी शौचालयाच्या निमित्ताने एक-एक कर्मचारी आंदोलनस्थळाहून बाहेर पडत होते. दुपारी ३.३० च्या सुमारास आंदोलकांनी भुलाभाई देसाई रोड येथील पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाजवळील उद्यान गाठले.

त्यानंतर त्यांनी पुढे हातातून आणलेले दगड, पायातील चपला भिरकावत सिल्व्हर ओकच्या दिशेने धावत गेले. मिळालेल्या माहितीनुसार बिट मार्शलला आंदोलनाची थोडी माहिती मिळाली होती. त्यानंतर याची माहिती बीट मार्शलने चार दिवसांपूर्वीच वरिष्ठांच्या कानावर घातली होती.

मात्र, त्यांच्याकडून योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात हलगर्जीपणा झाला अन् अचानक आलेला हा जमाव रोखणे पोलिसांना शक्य झाले नाही. आंदोलकांनी थेट ‘सिल्व्हर ओक’च्या आवारात जात दगड आणि चपला फेकल्या. यात दोन पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यात ‘या’ बड्या शिवसेना नेत्याचा हात? दरेकरांच्या आरोपांनी खळबळ
अनिल देशमुखांची जप्त केलेली संपत्ती परत करा; कोर्टाने आदेश देत ईडीलाच फटकारले
कीर्तनकारांचा अश्लील व्हिडिओ पाहून तृप्ती देसाई भडकल्या; केली ‘ही’ मागणी, नेमकं प्रकरण काय? – या हेडिंगने पण कर
‘या’ भारतीय क्रिकेटरवर कोसळला दुख:चा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याने अर्ध्यावर सोडली IPL

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now