कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावर, आंबेगाव बुद्रुक (ambegaon) ते बाबाजी पेट्रोल पंप या ठिकाणाहून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिला राजरोसपणे नियमित उभ्या राहत आहे. या सर्व गोष्टीमुळे तिथून जाणाऱ्या महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनींमध्ये प्रचंड मनस्ताप होत आहे. (ambegaon prostitution business)
आंबेगावचा परिसर हा झपाट्याने विकसित होत चालला आहे. या परिसरात दाट लोकवस्ती, शाळा, कॉलेज यांशिवाय परिसरात मोठमोठ्या सदनिका उभारल्या जात आहे. दरम्यान, दक्षिण पुण्यातील असणाऱ्या सरकारी यंत्रणांच्या नाकावर टिच्चून आंबेगाव ते नवलेपूल दरम्यान खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु आहे.
कात्रज नवलेपूल बाह्यवळण मार्गावर असणाऱ्या गणराज हॉटेलजवळ उघडपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे दिसून येत आहे. या गोष्टीमुळे तिथल्या स्थानिक नागरिकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच यावर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.
तसेच याबाबत एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला विचारण्यात आले असता, तिने पोलिसांना हफ्ते दिल्यामुळे ते आमच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगितले आहे. नागरीवस्ती असणाऱ्या या परीसरात वेश्य उघडपणे ग्राहक शोधताना दिसतात.
या गोष्टीमुळे सर्वसामान्या महिला आणि विद्यार्थीनी मोठी अटकळ होते. तसेच तिथे असलेल्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनाही याचा त्रास होतो. तसेच त्यांना नागिराकांनी विचारपूस केली असता, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी पोलिसांवरच आरोप केले आहे.
तसेच कुणी तक्रार केली, तर मात्र काही दिवस आमचे इथे उभे राहणे बंद होते. काही दिवस जागा बदलावी लागते. त्यानंतर हफ्ता वाढवून द्यावा लागतो, असा आरोप वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी केला आहे. पोलिसांनी हफ्ता घेत त्यांना परवानगी दिल्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच या वेश्या व्यवसायात तिथे असणाऱ्या लॉज मालकांचाही सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. अशात मार्केटला जाणाऱ्या आणि नोकरीला जाणाऱ्या महिलांनाहा काही ग्राहकांनी विचारपूस केल्याची धक्कादायक घटना घडल्या आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर हटवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
नागिन ६ चे कलाकार घेतात तब्बल इतके मानधन, बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाश आहे दुसऱ्या क्रमांकावर
ऐतिहासिक निकाल! ४९ पैकी ३८ दोषींना न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा, ११६३ साक्षीदारांना केले होते सादर
काय सांगता! स्विगी बॉयला असतो तब्बल एवढा पगार; पॅकेज ऐकून तुम्हीही निवडाल हा करिअर ऑप्शन
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..