शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ३९ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (new 2 mla support eknath shinde)
एकनाथ शिंदे यांच्या या मोठ्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. त्यामुळे ते पुन्हा येतील याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीये.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुप प्रयत्न केले पण ते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. हे सगळं पाहून अखेर उद्धव ठाकरेंनी बुधवारी रात्री वर्षा बंगला सोडला आहे. पण त्यांनी वर्षा बंगला सोडताच उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटले आहे. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल आले होते. पण त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. ते गुवाहटीला रवाना झाले आहे.
आता शिंदेसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४१ झाली आहे. दादर मोहिमचे आमदार सदा सरवणकर आणि कुर्ला मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर हे शिवसेनेच्या गोट्यातून बाहेर पडले आहे. या दोन्ही आमदारांनीच बुधवारी बंडखोर आमदारांवर टीका केली होती.
तसेच शिवसेनेचे विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड केली, त्यावेळी हे दोन्ही आमदार तिथेच उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. तसेच माझं काय चुकलं असा सवालही त्यांनी केला होता, पण त्यानंतर दोन्ही आमदारांनी गुवाहटीचा रस्ता धरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ आजोबांनी करोडोंच्या संपत्तीवर सोडलं पाणी, सर्व सोडून एकटेच राहतायत बेटावर, कारण..
बाळासाहेबांची सेना म्हणाणारे एकनाथ शिंदे स्थापन करणार नवा पक्ष? ‘हे’ आहे नव्या पक्षाचे नाव
राकेश झुनझुनवाला: फक्त ५ हजारात सुरू केलं ४० हजार कोटींचे साम्राज्य, आता देतायत टाटांना टक्कर