काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. याच प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात देखील उमटले होते. त्यानंतर या संदर्भातील याचिकांवर निकाल देताना कर्नाटक हायकोर्टाने हिजाब ही अनिवार्य धार्मिक प्रथा नसल्याचा निकाल दिला होता. कोर्टाच्या या निकालाचा अनेक राजकीय नेते आणि मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता.
तर दुसरीकडे त्यानंतर कर्नाटकमधील अनेक मंदिरांनी त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदूंसाठीच स्टॉल लावण्याची परवानगी मर्यादित केली आहे. पश्चिम कर्नाटकच्या भागात काही बॅनर दिसले होते, ज्यावर ‘मंदिर परिसरात उभारण्यात येणा-या मुस्लिमांच्या स्टॉल्सना बंदी’, असे लिहिले होते.
यावरुन आता भाजपचा एक बडा नेता आक्रमक झाला असून त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का विकास आणि विश्वास’ हा संदेश दिला आहे. मात्र आपले राज्य चुकीच्या दिशेने जात असल्याचा आरोप भाजप नेत्यानेच केला आहे.
मंदिराच्या उत्सवादरम्यान मुस्लिम विक्रेत्यांना व्यापार करण्यावर बंदी घातल्याबद्दल राज्य सरकारच्या मौनावर भाजप नेत्याने सवाल उपस्थित केले आहे. कर्नाटकमध्ये, भाजपाचे ज्येष्ठ आमदार एएच विश्वनाथ यांनी नाराजी व्यक्त व्यक्त करत पक्षाची कानउघडणी केली आहे.
रविवारी म्हैसूरमधील भाजपचे विधान परिषद सदस्य एएच विश्वनाथ हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण मुस्लिमांप्रमाणे वागतो तसंच इतर मुस्लीम बहुसंख्य देश हिंदूंशी वागू लागले तर सरकार काय करेल, असा संतप्त सवालही त्यांनी बोलताना उपस्थित केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “धर्माचे राजकारण करणे अत्यंत धोकादायक आहे. निवडणुका जिंकण्यासाठी कधीही धर्माचा वापर करू नये. याच्या आधारे तुम्ही किती निवडणुका जिंकाल?” असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी राज्य सरकारने हस्तक्षेप करायला हवा, अस मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘कोणताच देव आणि धर्म ही शिकवण देत नाही. मला कळत नाही, सरकार या मुद्द्यावर गप्प का आहे? मला कळत नाहीये की हे कोणत्या आधारवर मुस्लीम व्यापाऱ्यांना लक्ष्य करत आहेत? ही परिस्थिती अत्यंत खेदजनक आहे. सरकारने या प्रकरणात कारवाई करावी अशी लोकांची प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
युद्ध झाले तर ‘या’ मिसाइल घेऊन सज्ज आहे भारत, शत्रुला श्वास घेण्याचीही मिळणार नाही संधी; जाणून घ्या..
इंजिनिअरच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड, संपत्ती मोजून अधिकाऱ्यांचीही झाली दमछाक
“शरद पवारांचं सर्व आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे”, सदाभाऊंची सडकून टीका
जर करिश्माने ‘हा’ हट्ट धरला नसता आज तिचा नवरा असता अक्षय खन्ना, 47 वर्षांच्या वयातही आहे बॅचलर