बॉलिवूडची सुंदर जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे नुकतेच लग्न पार पडले. दोघांच्या जवळचे मित्र नातेवाईक सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या शाही लग्नाला अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
रणबीर कपूरच्या घरच्या वास्तूवरही मीडिया आणि चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, रणबीर कपूरच्या शेजाऱ्याने त्यांच्या लग्नाबाबत तक्रार दाखल केली आहे. मात्र, ही तक्रार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या विरोधात नाही तर व्हेन्यूवर जमा झालेल्या मीडिया रिपोर्ट्सविरोधात करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे शेजारी मीडियामुळे घाबरले आहेत. पाली हिलच्या वास्तूमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. जिथे शेजाऱ्यांना खूप त्रास होत होता. एवढेच नाही तर शेजाऱ्यांनी काल संध्याकाळी पाली हिल रेसिडेंट असोसिएशनकडे (PHRA) तक्रार पाठवली आहे.
ज्यामध्ये पीएचआरएने हस्तक्षेप केल्यानंतर वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याला पाचारण करण्यात आले. ही तक्रार माध्यमांविरुद्ध होती. शेजाऱ्यांच्या लक्षात आले की जेव्हा मिडीया सेलिब्रिटी किंवा कोणताही क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करते तेव्हा मीडिया नियंत्रणात राहत नाही.
काही प्रसारमाध्यमे घाई घाईत स्पीड ब्रेकरला धडकले आणि त्यांनी स्वताला जखमी करून घेतले असा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. एका शेजाऱ्याने सांगितले की, मीडियाचे लोक कारवर हल्ला करत होते. पाली हिल रहिवासी संघटनेचे सचिव मधु पोपलाई यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
ते म्हणाले, माध्यमांनी हे समजून घेतले पाहिजे की पाली हिल हा उताराचा भाग आहे आणि हे उतार काही उपनगरातही आहेत. गेल्या ३/४ दिवसांपासून वाहने चालवणे किंवा ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले आहे. सुमारे 200 प्रसारमाध्यमे रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत आणि ते कोणत्याही क्षणी कुठूनही बाहेर पडत आहेत. हे दुसरं काही नसून सुरक्षा नियमांचे उल्लघण आहे.
महत्वाच्या बातम्या
भोंग्यांवर बोलताना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना डिचवलं, म्हणाले, भोंगे लावले, तर…
लग्नानंतर रणबीर आणि आलियाचे ‘ते’ फोटो झाले व्हायरल, एकमेकांना किस करताना दिसले वर-वधू
लिंबाचे भाव इतक्या झपाट्याने का वाढत आहे? धक्कादायक कारण आले समोर
भावाच्या लग्नात करिना कपूरची दिसली हटके स्टाईल, रणबीर आलिया झाले पती पत्नी, पहा खास फोटो