अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वक्तव्यांमुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. आता कपिल शर्माच्या शोमध्ये नेहाचे एक धक्कादायक रहस्य उघड झाले. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. (neha dhupia kiss mahesh manjrekar)
नेहाने एक असा खुलासा केला आहे, ज्यामध्ये असे समोर आले की, एकदा नेहाने तिच्या सहकाऱ्याला किस करण्यापूर्वी त्याला हात धुवायला लावले होते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे होते. त्यांना किस करण्यापूर्वी नेहाने त्यांना पाच वेळा हात धुवायला लावले होते.
नेहा धुपिया आणि यामी गौतम अ थर्सडे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचल्या होत्या. शोच्या प्रोमोमध्ये नेहा आणि यामी काळ्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. शोमधील संवादादरम्यान कपिलने नेहाबद्दल खुलासा केला की दस कहानीयाँ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नेहाने तिच्या स्टारला किस करण्यापूर्वी पाच वेळा हात धुवायला लावले होते.
नेहाने कपिलची खिल्ली उडवत म्हटले की, ती आता विवाहित आहे आणि अशा भूमिका अजिबात करू शकत नाही. कपिलने नेहा धुपियाची खिल्ली उडवत म्हटले की, तुम्ही पाणीपुरी करणाऱ्याला हात धुवायला किंवा अंघोळ करायला सांगता का? आम्ही तुम्हाला सांगतो की, नेहाने महेश मांजेरकरसोबत दस कहानीयाँमध्ये काम केले होते.
यावेळी कॉमेडियन कृष्णा अभिषेकने नेहाचा पती अंगद बेदीची खिल्ली उडवत म्हटले की, जेव्हा तो जिममधून बाहेर येतो तेव्हा मला धावत जाऊन त्याला असे म्हणावेसे वाटते की तुला शर्ट हवा आहे का? या चित्रपटाबाबात बोलाल तर अ थर्सडेमध्ये यामी गौतम अपहरणकर्त्याची भूमिका साकारत आहे. ज्यामध्ये ती मुलाच्या बदल्यात ५ कोटींची खंडणी मागते.
रणविजयनंतर बॉस लेडीची प्रतिमा असलेल्या नेहाने रोडीजचा निरोप घेतला आहे. नेहा यापुढे रोडीजच्या आगामी सीझनचा भाग असणार नाही. या शोमध्ये नेहा गँग लीडरच्या भूमिकेत होती. रणविजय सिंगच्या जाण्यामुळे चाहते आधीच दु:खी होते, आता नेहाने शो सोडल्याने त्यांना धक्का बसला आहे.
नेहा म्हणते की, लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर तिचे आयुष्य खूप बदलले आहे. नेहाने सांगितले की माझ्या मुलांमुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. माझी मुले पूर्णपणे माझ्यावर आणि माझ्या पतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे मला त्यांना सांभाळण्यासाठी वेगवेगळे निर्णय घ्यावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तुमची गाडी ८ वर्षे जुनी असेल तर तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, नाहीतर होणार कारवाई
“सामान्य माणसाला ह्रदयाचे ठोके सांभाळायला जमणार नाही म्हणून..”, कपिलने असं म्हणताच लाजली माधुरी
भयानक! शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तीन शिवप्रेमींचा अपघात, २०० फुट दरीत कोसळली मोटरसायकल