Share

पुरावे म्हणून पेनड्राईव्ह मधून दिलेले ते व्हिडीओ फडणवीसांच्याच काळातील; राष्ट्रवादीने बाजी उलटवली

devendra fadanvis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी आरोप केला आहे. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे. (ncp revealed fadanvis pendrive video)

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांचे हे सर्व आरोप खोडून काढले आहे. इतकंच नाही, तर आता राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीसांवरच पलटवार करत नवा दावा केला आहे.

खोट बोला पण रेटून बोला असं काम काल देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झालेले आहे. एक कथीत पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. त्यापैकी काही व्हिडिओ हे माध्यमांवर दाखवण्यात आले आहे. त्यावर एक तारीख होती, त्यावर १ जानेवारी २०१९ ही तारीख होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

१ जानेवारी २०१९ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते. काल्पनिक व्हिडिओ दाखवून देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे. कारण या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार १८ नोव्हेंबर २०१९ ला स्थापन झाले होते, असेही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

तसेच यासंदर्भातील तक्रार राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार आहोत. या व्हिडिओतील खरा सुत्रधार कोण, डायरेक्टर कोण, प्रोड्युसर कोण? या सर्वांची सखोल चौकशी करुन, महाराष्ट्रासमोर सत्य आणावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्याच्या गृहमंत्र्यांना करण्यात येणार आहे, असेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी १२५ तासांच्या या स्टिंगमधील सर्वात महत्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेन ड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला आहे. भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
महापुरूषांना बदनाम करून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे- राज ठाकरे
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे…
“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now