Share

..त्यामुळे दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही ‘आप’ला मतं दिली, शरद पवारांनी सांगितले कारण

sharad pawar

विधानसभा निवडणुकीचे बहुतेक निकाल हाती आले असून पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज पाहायला मिळले. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे.

या निकालावरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘मला असा विश्वास वाटतो की देशात भाजपविरोधात प्रादेशिक पक्ष मोठ्या संख्येत एकत्र येतील. तेलंगणा, आंध्र, केरळ, तामिळनाडू किंवा पश्चिम बंगाल, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये भाजपशिवाय राजकीय पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. यावर विरोधकांना एकत्र येऊन चर्चा करावी लागेल.’

तर तिकडे पंजाबच्या निकालानं पूर्ण राजकारण बदललंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे. या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही ‘आप’ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता.’

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘पंजाबमधला बदल भाजपला अनुसरुण नाही तर हा बदल काँग्रेस पक्षाला एक प्रकारे धक्का देणारा आहे. आप हा अलिकडे तयार झालेला पक्ष, त्यांनी दिल्लीत दोनवेळा ज्या प्रकारे विजय मिळवला आणि ज्या प्रकारे सरकार चालवलं त्या बद्दलची मान्यता दिल्लीच्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे.’

दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता. पवार म्हणाले, ठिक आहे.. ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप केला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव
नवज्योतसिंग सिद्धूंसारख्या दिग्गज नेत्याला हरवणाऱ्या ‘पॅड वूमन’ जीवन ज्योत कौर कोण आहेत?
दारू पिऊन संसदेत आल्याचा झाला होता आरोप, ‘या’ कारणामुळे कुटुंबाने सोडले; वाचा पंजाबच्या भावी मुख्यमंत्र्यांबद्दल..
‘द काश्मिर फाईल्स’चा नवीन ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी, ट्रेलर पाहून तुमचीही वाढेल उत्सुकता

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now