राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सत्ता, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. ठाकरे सरकार सत्तेत पायउतार होताच पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे नेते देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. सध्या सगळ्याच पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे सरकारला बसलेला धक्का मोठा असल्याच बोललं जातं आहे. मात्र अशातच खुद्द राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक सकारात्मक व्यक्तव्य केलं आहे.
‘सत्तेचा गैरवापर करणारे फार काळ टिकत नाहीत. केंद्रातील हुकूमशाही सरकारचाही शेवट होईल,’ असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. पवार याबाबत शुक्रवारी नागपूर येथे एका कार्यक्रमाला बोलताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्यांवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘श्रीलंकेमध्ये एका कुटुंबाकडे सत्ता केंद्रित झाली होती. सत्तेचा वापर आम्हाला पाहिजे तसा आम्ही करणार, असा प्रकार सुरू होता. त्याचा परिणाम काय झाला हे आज संपूर्ण जग बघत आहे. तेथील तरुण मुले राष्ट्रपतींच्या घरात शिरून आंदोलन करीत आहेत.’
पुढे बोलताना पवारांनी म्हंटलं आहे की, ‘जर कुणी सत्तेचा गैरवापर करत असेल तर लोक त्याची हुकूमशाही उलथवून टाकतात. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. एकसंध राहून पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करा,’ असं मोलाच मार्गदर्शन पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, ‘विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीमधील अनेक नेते सोडून गेले. मात्र, पुन्हा पक्ष उभा केला. त्यानंतर पन्नासहून अधिक जागा आपण जिंकल्या. अडीच वर्षे सत्तेत राहून लोकहिताची कामे केली. मात्र भाजपने केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून पहिल्या दिवसापासून राज्य सरकार अस्थिर करण्याचे काम केले, असं पवारांनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान
“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा
गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे