शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळासह राज्यात देखील सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे.
बंडखोरांना पुन्हा आणण्यासाठी शिवसेनेने आता ‘इमोशन्स’वर काम करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन राज्यातील वातावरण ‘इमोशनल’ करायचे आणि सहानुभूती-संतापाची भावनिक लाट तयार करायची, असे या बैठकीत ठरले आहे. याचबरोबर ३७ पेक्षा एकही आमदार कमी असला, तरी शिंदेसेनेचे बंड फसेल, अशी रणनीती बैठकीत ठरल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे पूर्ण व्यक्तिमत्त्व उभे आहे, ते भावना आणि अस्मितेवर. त्यामुळे भावनिक आवाहन करणारी निवेदने उद्धव ठाकरे यांनी सातत्याने करण्यात येणार आहे. तसेच आगामी काही दिवसांत झंझावाती मेळावे घेण्याची योजना देखील तयार केली असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे कालपासून शरद पवार यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे आता शिंदे हे बंड मागे घेणार का? पुढील राजकीय घडामोड नक्की कशी असेल? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदेंची बाजू घेणाऱ्या गोगावलेंना किशोरी पेडणेकरांनी ठणकावले; आॅडीओ क्लिप व्हायरल
शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर शिंदे गटाला पाठिंबा देणारे जिल्हाप्रमुख झाले फरार
एकनाथ शिंदेंनी आपल्या ‘त्या’ विधानावरून मारली पलटी; गोत्यात येणार असल्याच लक्षात येताच केली सारवासारव