कर्जत-जामखेडचे माजी आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहितीये. कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळवत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. तेव्हापासून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
आता पुन्हा एकदा राम शिंदे यांनी रोहित पवारांवर खळबळजनक आरोप केले आहेत. ‘चौंडी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी हडपली,’ असल्याच राम शिंदे यांनी म्हंटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दरवर्षी राज्यभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जाते. कर्जत-जामखेडमध्ये देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दणक्यात साजरी केली जाते. याचे कारण असे की, जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालाय.
याच निमित्ताने रोहित पवार यांनी चौंडी येथे तयारी करून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज नेते, मंत्री यांना निमंत्रण दिले आहे. मात्र त्याआधीच राम शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष केलं आहे. राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांच्या जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
याबाबत बोलताना राम शिंदे म्हणाले, ‘प्रशासनावर दबाव टाकून राष्ट्रवादीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाची आम्हाला परवानगी दिली नाही. जयंतीनिमित्त मी दरवर्षी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करतो, त्याला रोहित पवारांकडून आडकाठी आणण्यात आली.’
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ‘ही अहिल्यादेवींची जयंती नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आहे, असा घणाघाती आरोप राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला. पुढे बोलताना राम शिंदे यांनी आणखी काही खळबळजनक आरोप रोहित पवारांवर केले आहे. ते म्हणतात, ‘नदी खोलीकरण कामाच्या माध्यमातून चौंडी येथे भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून काम करण्यात आले.’
मात्र ‘रोहित पवारांचे हस्तकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणत वाळू उत्खनन केले. याचबरोबर याठिकाणी ग्रामपंचायतची ८० एकर जमीन रोहित पवारांनी प्रशासनाला हाताशी धरून हडप केली आहे, असा खळबळजनक आरोपही राम शिंदे यांनी केला आहे. यावर अद्याप रोहित पवारांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
नताशाच्या प्रेमामुळे सतत वादात राहणारा पांड्या बनला जबाबदार, नाईट क्लबपासून सुरू झाली दोघांची लव्हस्टोरी
PHOTO: नताशापेक्षाही सुंदर आहे हार्दिक पांड्याची वहिनी, हटके आहे भाऊ क्रुणाल पांड्याची लव्हस्टोरी
नताशासोबतचा फोटो शेअर करत पांड्याने दिले मनाला भिडणारे कॅप्शन; म्हणाला, हे आपल्या मेहनतीचे..
IPL विनर गुजरातचे ‘ते’ पाच खेळाडू जे रॉयल लाईफस्टाईलमध्ये आहेत सगळ्यांचे किंग, वाचा यादी