Share

शिवरायांच्या राज्यभिषेकाला कोणी विरोध केला हेही सांगा; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (ncp leader jitendra avhad criticize raj thackeray)

त्यानंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारमधील नेत्यांवर टीकाही केल्या. त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा जातीयवादावरुन टीका केली होती. तसेच शरद पवार कधीच महाराष्ट्र शिवरायांचा आहे, असे म्हणत नाही, असेही राज ठाकरेंनी म्हटले होते.

आता शरद पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला माहित नाही का? तेही सांगा. पण दुर्देवाने तुम्ही फक्त पुरंदरे वाचता. शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा काढला याचा सर्व मराठी जनतेला अभिमान आहे. पण जातीय तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंवर केली आहे.

भोंग्यांबद्दल इतकं प्रेम आहे, तर सभा का घेतली? जिथं सभा घेतली, तिथे एका बाजूला शाळा आहे. तर दुसऱ्या बाजूला विद्यालय आहे. सर्वोच्च न्यायालय सांगतं की, शाळेच्या १०० मीटरच्या आजूबाजूला भोंगे लावू नका. मग तुम्ही नियमांचे उल्लंघन केले आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

तसेच पेशवे नव्हते हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा? हा जातीय भेद कोणी निर्माण केला? पेशव्यांवर चित्रपट निघतात. हे सर्व तुम्ही कधी बोलणार? दुसऱ्यांची टिंगल-टवाळी करणं हे कधी सोडणार? तुम्हाला महागाई दिसत नाही का, त्यावर गप्प का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनी भरवश्यावर ते केलंय. त्यांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज त्यांचे वारसदार आहे. हे दोघेही माझे आदर्श आहे, म्हणत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. तिघांच्या आचरणात छत्रपती शिवाजी महाराज होते. या तिघांचं नावं घेणं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेणं आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आता शरद पवारांवर टीका नको, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसची थेट राज ठाकरेंना धमकी
माझी पत्नी माझं खुप रक्त पिते, काही उपाय असेल तर सांग भाऊ, सोनू सूदने दिले मजेशीर उत्तर, म्हणाला..
बाकीचे १० जण काय लस्सी प्यायला गेले होते का? विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी संतापला

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now