Share

आता हसन मुश्रीफ यांचा नंबर? किरीट सोमय्यांचे ट्विट चर्चेत, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

kirit somaiya

काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच ठाकरे सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

तर दुरिकडे भाजप नेते किरीट सोमय्यांचा पुणे दौरा चांगलाच गाजला. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना टार्गेट केले आहे. याबाबत ट्विट करत सोमय्यांनी मुश्रीफ यांचाविरोधात आता कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा चालवून आल्यानंतर त्यांनी आता हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल असं म्हटलं होतं. त्यानुसार, आज किरीट सोमय्या पुण्याला जाणार असून, मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1509714411283394592?s=20&t=eB6waHNEGs7xZ88cdf9Cqw

दरम्यान, सोमय्या यांनी मुश्रीफ यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याने हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं, ‘मुश्रीफ यांचं कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली.

तसेच पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘फसवणूक, शेल कॉससाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे. लवकरच या प्रकरणावर सुनावणी होईल.’ तसेच गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याप्रकरणी सोमय्या यांनी आरोप केले होते. सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती. मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या
..तर स्वत:साठी फाशीचा दोर आवळलाच समजा, मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे तक्रार करताच राऊतांचा इशारा
सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर.., शरद पवार भाजपवर पुन्हा बरसले
गॅस सिलींडरचा पुन्हा भडका! तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले भाव, सामान्यांच्या खिशावर ताण
जर भारताचे चीनशी संबंध बिघडले तर रशिया देणार भारताची साथ, वाचा यामागची प्रमुख कारणे

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now